मुंबई:  राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि नागपूर वगळता 25 जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 फेब्रुवारीला दहा महापालिकांसाठी मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदाना पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. तसंच दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
जिल्हा परिषदेसाठी मतदानपहिला टप्पा 15 जिल्हा परिषद आणि 165 पं. समितीसाठी 16 फेब्रुवारी मतदान औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, दुसरा टप्पा 11 जिल्हा परिषद आणि 118 पं. समितीसाठी - 21 फेब्रुवारीला मतदान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली, निकाल - 23 फेब्रुवारी सर्व दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान आणि 23 फेब्रुवारीला निकाल
जिल्हा परिषदमतदानाची तारीखनिकालाची तारीख
रायगड21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
रत्नागिरी21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
सिंधुदुर्ग21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
पुणे21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
सातारा21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
सांगली21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
सोलापूर21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
कोल्हापूर21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
नाशिक21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
जळगाव16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
अहमदनगर16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
अमरावती21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
बुलडाणा16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
यवतमाळ16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
औरंगाबाद16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
जालना16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
परभणी16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
हिंगोली16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
बीड16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
नांदेड16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
उस्मानाबाद16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
लातूर16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
नागपूर- -
वर्धा16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
चंद्रपूर16 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
गडचिरोली(16 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी) 23 फेब्रुवारी
 

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम तपशीलपहिला टप्पा (15 जि. प. व 165 पं.स.)दुसरा टप्पा (11 जि. प. व 118 पं.स.)
नामनिर्देशनपत्र सादर करणे27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 20171 ते 6 फेब्रुवारी 2017
नामनिर्देशनपत्रांची छाननी2 फेब्रुवारी 20177 फेब्रुवारी 2017
जिल्हा न्यायाधीशांकडे अपील5 फेब्रुवारी 201710 फेब्रुवारी 2017
निकालाची संभाव्य अंतिम तारीख8 फेब्रुवारी 201713 फेब्रुवारी 2017
अपील नसल्यास उमेदवारीची माघार7 फेब्रुवारी 201713 फेब्रुवारी 2017
अपील असल्यास उमेदवारीची माघार10 फेब्रुवारी 201715 फेब्रुवारी 2017
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी करणे10 फेब्रुवारी 201715 फेब्रुवारी 2017
मतदानाचा दिनांक16 फेब्रुवारी 201721 फेब्रुवारी 2017
मतमोजणीचा दिनांक23 फेब्रुवारी 201723 फेब्रुवारी 2017

दहा महापालिका

महापालिकामतदानाची तारीखनिकालाची तारीख
मुंबई21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
पुणे21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
पिंपरी चिंचवड21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
ठाणे21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
उल्हासनगर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नाशिक21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नागपूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
अकोला21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
अमरावती21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सोलापूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
  संबंधित बातम्या
10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान, 23 फेब्रुवारीला निकाल
माझी पालिका माझं मत: महानगरपालिका निवडणूक तारखा जाहीर