महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी आज निवडणूक पार पडली.
वाचा : भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?
विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 9 मतं फुटल्याचं समजतं आहे. त्यामुळे पक्षाला दगा देणारे आमदार कोण, याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे.
नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचं उघडपणे जाहीर केलं. दरम्यान, छगन भुजबळ आणि अर्जुन खोतकर यांना मतदान करता आलं नाही. राज्यात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नोटाचा पर्याय वापरण्यात आला होता.
प्रसाद लाड यांची राजकीय कारकीर्द
– राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचे विश्वासू
– राष्ट्रवादीत असताना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काही काळ काम
– म्हाडाच्या अध्यक्षपदीही काही काळ नेमणूक
– भाजपची सत्ता आल्यावर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीविरोधात अपक्ष म्हणून लढले
– या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, तरीही पराभव
– पराभवानंतर भाजपमध्ये प्रवेश, मुंबई उपाध्यक्षपदी नेमणूक
– मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख
प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?
- जंगम मालमत्ता : 47 कोटी 71 लाख रुपये :
– एकूण जंगम मालमत्तांपैकी 39 कोटी 26 लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरुपात गुंतवणूक केलेली आहे.
– लाड यांची पत्नी नीता यांच्याकडे 48 कोटी 95 लाख
– मुलगी सायलीकडे 11 कोटी 15 लाख
– मुलगा शुभम याच्याकडे 28 लाख 28 हजार रुपये
- स्थावर मालमत्ता : 55 कोटी 86 लाख :
– एकूण स्थावर मालमत्ता पैकी पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यावसायिक इमारत, दादरच्या कोहिनूर मिल इमारतीत सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत.
– पत्नी निता यांच्याकडे 54 कोटी 94 लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवासी इमारत या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.
– याव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी 10 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे.
प्रसाद लाड आणि कुटुंबीयांवर नेमकं कर्ज किती?
– त्याचबरोबर प्रसाद लाड यांच्यावर 41 कोटी 48 लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे 42 कोटी 21 लाखाचे कर्ज आहे. मुलगी सायली हिच्या नावे 1 कोटी 7 लाख तर मुलगा शुभम याच्या नावे 18 लाख 49 हजार रुपयांचे कर्ज आहे.
– प्रसाद लाड यांनी 2016-17 या वर्षात चार कोटी 22 लाख रुपये इन्कम टॅक्स भरला आहे. तर पत्नीने 1 कोटी 84 लाख रुपये इन्कम टॅक्स भरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
LIVE UPDATE :
विधानपरिषद निवडणूक निकाल
दिलीप माने- 73
प्रसाद लाड- 209
दोन मतं बाद- 2
- विधानपरिषद पोटनिवडणुचं मतदन संपलं, पाच वाजता मतमजोणी,
- MIM च्या दोन आमदारांची मतदानाला दांडी, तर छगन भुजबळ, अर्जुन खोतकर मतदानासाठी अपात्र
- कोर्टाकडून छगन भुजबळ यांना परवानगी न मिळाल्याने ते मतदान करणार नाहीत
- एमआयएम आमदार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदान करणार नाही, आमदार वारिस पठाण आणि इमियाज जलील यांची मतदानाला दांडी
- शिवसेना आमदारांवर उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाही, त्यामुळेच प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून मिलिंद नार्वेकरांना विधानभवनात बसवलं, राष्ट्रवादीचा तिरकस टोला
- विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनाच तिसरा डोळा, पोलिंग अजेंट म्हणून मिलिंद नार्वेकर यांचं जातीने लक्ष, क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून शिवसेनेचा पवित्रा
- आतापर्यंत भाजपच्या 102, शिवसेनेच्या 51, राष्ट्रवादीच्या 36 आणि काँग्रेसच्या 32 आमदारांचं मतदान
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला
- पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं पहिलं मतदान
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता या जागेसाठी आज (गुरुवार) पोटनिवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर तसंच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक होणार आहे.
खरंतर विधानपरिषदेच्या एका जागेसाठी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार का यावरुन या निवडणुकीला रंगत आली होती.
मात्र, शिवसेनेचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजपने प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर लागलीच काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांना रिंगणात पुढे करण्यात आलं.
या पोटनिवडणुकीची आजच मतमोजणी होणार आहे.
संख्याबळ पाहता प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र असं असलं तरी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बैठक घेऊन विरोधकांनीही दिलीप मानेंच्या विजयासाठी एकत्र येण्याची ग्वाही दिली आहे.
विधानपरिषदेत कोणत्या पक्षाकडे किती आमदार?
भाजप - 122
शिवसेना - 63
अपक्ष - 7
एकूण - 192
पण आमदारकी रद्द झाल्याने अर्जुन खोतकर यांनी मतदानाचा हक्क गमावला. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे एकूण 191 आमदार मतदान करणार.
तर
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी - 41
एकूण - 83
राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि रमेश कदम हे दोन आमदार तुरुंगात असल्याने एकूण 81 सदस्यांनाच मतदान करता येणार आहे.
संबंधित बातम्या :
भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?
संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!
विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी
काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात गुन्हा