मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या रस्त्यावर उतरुन कामं करुन घेण्याच्या प्रसंगी स्वत : ते काम हाती घेण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदे यांनी अनेकदा संकटात असलेल्यांना मदत केल्याची उदाहरणं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री ठाण्याहून मुंबईकडे येत असताना त्यांच्या सतर्कतेचं आणखी एक उदाहरण दिसून आलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळं संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली.


वाचा नेमकं काय घडलं?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांना एका डंपरचा अपघात झालेला दिसला. या डंपरमधून ऑइल खाली सांडत असल्याने दुचाकीस्वार घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला. एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळावरील परिस्थिती पाहिली. मुख्यमंत्र्यांनी सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांच्या मदतीने या सांडलेल्या ऑईलवर माती घातली. 


एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्टाफमधील पोलिसांच्या मदतीने दुचाकीस्वारांना एका बाजूने हळू जाण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांना सर्व परिस्थिती समजावून सांगितलं. जोपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित होत नाही तोपर्यंत वाहतूक पोलिसाला तिथे थांबण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना सदरची परिस्थिती सांगितली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी  थांबून वाहनांना नीट पुढे पाठवावे.  दुर्घटना झालेला ट्रक लवकरात लवकर हटवून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना देऊन ते मुंबईकडे ध्वजवंदन सोहळ्यासाठी रवाना झाले.



महाराष्ट्र काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभा राहतो : एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाहतूक शाखेच्या पोलिसांना सूचना देऊन मुंबईतील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्ही संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांचा त्याग वाया जाऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या सरकारचं आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम सुरु आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आम्ही आमच्यावर होणाऱ्या आरोपांना कामातून उत्तरं देत आहोत.  आम्ही कामं  करतोय, महाराष्ट्र घरी बसणाऱ्यांच्या मागं उभा राहत नाही. तर, कामं करणाऱ्यांच्या मागं उभा राहतो, असं त्यांनी म्हटलं. 


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती मुंबईतील सर्व जागा जिंकेल असं म्हटलं. 


संबंधित बातम्या : 


Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.


Uddhav Thackeray: महाराष्ट्राला कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे