मुंबई :  महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ,असा इशारा उद्धव ठाकरेंनी (UddhavThackeray)दिला आहे.  महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) हुतात्मा स्मारक इथं रात्री उद्धव ठाकरेंनी आदरांजली  वाहिली.  उद्धव ठाकरेंसोबत अदित्य ठाकरे, अनिल देसाई, संजय दिना पाटील, अरविंद सावंत,  सचिन अहिर, सुनिल शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. 


उद्धव ठाकरे म्हणाले,  ज्या लोकांनी आपलं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली.  आमचे कर्तव्य आहे त्यांना अभिवादन केलं पाहिजे.  आजच मी खडकवासच्या सभेत बोललो आहे,  ज्यांनी ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला हा महाराष्ट्र कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही.  जे जे महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतात त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि जिद्द काय असते ते येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही लुटारूंना दाखवून देऊ.


प्राण गेला तरी चालेल पण महाराष्ट्र जाऊ देणार नाही : उद्धव ठाकरे


आज महाराष्ट्र दिवस आहे. फक्त हुतात्मांना अभिवादन करून चालणार नाही. ज्यांनी आपल्याला मुंबई, महाराष्ट्र मिळवून दिला ते आपल्याकडे बघतायत. मी शपथ घेऊन सांगू इच्छितो प्राण गेला तरी चालेल पण महाराष्ट्र जाऊ देणार नाही. महाराष्ट्र गद्दार नाही.  शुरांना वंदन करायचे असते परंतु  चोर आम्ही वंदिले असे भाजपचे चालू आहे,  असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.   


आज महाराष्ट्र दिन


महाराष्ट्र आणि मराठी मनाच्या दृष्टीने आनंदाचा, अभिमानाचा आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले.  1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, निपाणी हे जिल्हेदेखील महाराष्ट्रात यावे ही मागणी होती. मात्र, ही मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. त्यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे.   


हे ही वाचा :


Maharashtra Day 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज


Video: