Eknath Shinde Dasara Melava : आमच्या मातोश्रीने जो स्वाभिमानाचा विचार दिला, तोच धागा घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. बीकेसीवर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात धैर्यशील माने यांनी मनोगत व्यक्त केले. आम्हाला गद्दार म्हणण्यात अर्थ नाही, गद्दार नही, खुद्दार है हम, रक्ताचे नसलो, तरी विचारांचे आम्ही वारसदार आहोत आम्ही असेही ते म्हणाले.
धैर्यशील माने म्हणाले, बाळासाहेबांच्या विचाराशिवाय, व्यक्तीमत्वाशिवाय शिवसेना अपुरी आहे. त्यांनी शिवसैनिकांना संधी देऊन मोठं केलं. लढण्याचे स्फुरण दिलं. आमच्या मातोश्रीने आम्हाला स्वाभिमानाचा विचार दिला, तोच धागा घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेबांच्या माघारी जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्याचे एकनाथ शिंदे करत आहेत.
धैर्यशील माने पुढे म्हणाले, जी शिवसेना बाळासाहेबाना अभिप्रेत होती, जी शिवसेना कुणाला बांधिलकी नव्हती, त्याची बांधिलकी फक्त बाळासाहेबांच्या विचाराची होती. हिंदुत्वाची होती. गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे जेव्हा बाळासाहेब आमच्यातून निघून गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली तेव्हा प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेब समजू लागला, त्या शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली.
आज अनेकांना प्रश्न पडतो, शिवसेना कोणाची ? पण बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या प्रत्येक शिवसेनेची आहेय, ही सगळ्याची शिवसेना आहे. या शिवसेनेचा धागा घेऊन आपण घरोघरी गेलं पाहिजे. बाळासाहेबांचा विचार बाजूला ठेवायचा नव्हता, स्वाभिमान बाजूला ठेवायचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेना शिवधनुष्य उचलावे लागले, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही, तोच शिवसैनिक आज अडचणीत आहे. शिवसैनिक संपर्क अभियानातून आम्हाला शिवसैनिक अडचणी सांगू लागले होते. त्या शिवसैनिकाची अडचण कोणी ऐकायला तयार नव्हते. त्याचे ऐकण्याचे काम लोकनात एकनाथ शिंदे यांनी केले. ही लढाई तुमची आमची नसून गावागावात असलेल्या शिवसैनिकाची लढाई आहे, त्यासाठी एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, असेही माने म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या