Maharashtra Political Crisis : गेल्या 14 दिवसांपासून राज्यात अभूतपूर्व संघर्ष सुरु आहे. या संघर्षातील पहिला टप्पा काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनं पार पडला आहे. तर आज एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं बहुमताची चाचणी मोठ्या फरकानं जिंकत दुसरी लढाई जिंकली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही सदस्य गैरहजर राहिले होते. आज देखील काही सदस्यांना मतदान करता आलं नाही. यात काही सदस्य उशीरा पोहोचल्यानं त्यांना सभागृहात एन्ट्री न मिळाल्यानं मतदानापासून वंचित राहावं लागलं. यात अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झीशान सिद्दीकी, धीरज देशमुख, संग्राम जगताप यांचा समावेश आहे. 


एकूण मतं – 286


(निधन – रमेश लटके, शिवसेना)


(पीठासीन अधिकारी – मतदानाचा अधिकार नाही – राहुल नार्वेकर, भाजप).


ठरावाच्या बाजूने – 164.


ठरावाच्या विरोधात – 99.


विश्वासदर्शक ठरावाला कोण-कोण नव्हते


1.     अशोक चव्हाण, काँग्रेस.


2.     विजय वडेट्टीवार, काँग्रेस.


3.     प्रणिती शिंदे, काँग्रेस.


4.     झीशन सिद्दिकी, काँग्रेस.


5.     धीरज देशमुख, काँग्रेस.


6.     अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी.


7.     संग्राम जगताप, राष्ट्रवादी.


8.     जितेश अंतापुरकर, काँग्रेस.


9.     कुणाल पाटील, काँग्रेस.


10.मुक्ता टिळक, भाजप (आजारी).


11.लक्ष्मण जगताप, भाजप (आजारी).


12.नवाब मलिक, राष्ट्रवादी (जेलमध्ये).


13.अनिल देशमुख, राष्ट्रवादी (जेलमध्ये).


14.मुफ्ती इस्माईल, एमआयएम.


15.निलेश लंके, राष्ट्रवादी.


16.दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी.


17.दिलीप मोहिते, राष्ट्रवादी.


18.राजू आवळे, काँग्रेस.


19.मोहन हंबर्डे, काँग्रेस.


20.शिरीष चौधरी, काँग्रेस.


21.  माधवराव जवळगावकरकाँग्रेस


तटस्थ –


1.     रईस शेख, सपा.


2.     अबू आझमी, सपा.


3.     शाह फकुर अन्वर, एमआयएम.


देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी


काही सदस्य गैरहजर असल्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टोलेबाजी केली. ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा ठराव मंजूर व्हावा याकरता बाहेर राहून अदृश्यपणे मदत केली त्यांचे आभार मानतो असं म्हणत फडणवीस यांनी टोलेबाजी केली. 


बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली


विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली. तर या प्रस्तावाच्या विरोधात 99 मतं पडली. काल विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाच्या विरोधात 107 मतं पडली होती. आज बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आजच्या प्रस्तावाच्या वेळी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे तीन आमदार तटस्थ राहिले