Maharashtra VidhanSabha Speaker : गेल्या 13 दिवसांपासून राज्यात अभूतपूर्व संघर्ष सुरु आहे. या संघर्षातील पहिला टप्पा पार पडला आहे. शिंदे सरकारमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून नरहरी झिरवळ यांनी कामकाज पाहिले. 


समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. शिरणगतीमध्ये राहुल नार्वेकर यांना164 मते मिळाली, तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. बहुजन विकास आघाडी, मनसे आणि अपक्ष भाजपच्या बाजूने उभे राहिले. 


दरम्यान, या विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीकडून सात आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. यामध्ये माजी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन झाल्याने ते सभागृहात येऊ शकले नाहीत. पारनेरचे आमदार निलेश लंके आजारी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे बबनदादा शिंदे, खेडचे दिलीप मोहिते, पिंपरीचे अण्णा बनसोडेही मतदानासाठी अनुपस्थित राहिल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. एमआयएमचे मुफ्ती इस्माईलही अनुपस्थित राहिले. 


कुणी मतदान केलं नाही?



  • मुक्ता टिळक, भाजप

  • लक्ष्मण जगताप, भाजप

  • प्रणिती शिंदे, काँग्रेस

  • जितेश अंतापुरकर, काँग्रेस


 राष्ट्रवादी 



  • नवाब मलिक

  • अनिल देशमुख

  • निलेश लंके

  • दिलीप मोहिते

  • दत्तात्रेय भरणे

  • अण्णा बनसोडे

  • बबनदादा शिंदे


एमआयएम



  • मुफ्ती इस्माईल


पीठासीन अधिकारी 



  • नरहरी झिरवळ


निधन



  • रमेश लटके, शिवसेना


तटस्थ



  • रईस शेख, सपा

  • अबू आझमी, सपा

  • शाह फारूख अन्वर, एमआयएम


इतर महत्त्वाच्या बातम्या