मुंबई : आययटीतील टेक फेस्टला 3 जानेवारी पासून सुरवात होत आहे. 3 ते 5 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या टेकफेस्टमध्ये आइन्स्टाइन रोबोट संवाद साधणार आहे. हॉंगकॉंगचा हा रोबोटे आपल्या चेहऱ्यावरील भावना ओखळतो. या रोबोटमध्ये हॅन्सन रोबोटिक्सने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चेहऱ्यावरच्या भावना ओळखण्याचे या रोबोटला प्रशिक्षण देण्यात आले आहे. समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखून हा रोबोट तो व्यक्ती दुःखी, आनंदी की संतापलेला आहे, हे सांगू शकतो. अशा 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यावरील भावभावना या आइनस्टाइन रोबोटला ओळखता येतात. 5 जानेवारीला आयआयटी टेकफेस्टमध्ये आयोजित एका कर्यक्रमा दरम्यान हा रोबोट उपस्थितीतांशी संवाद साधणार आहे. अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं हा आईन्स्टाईन रोबोट देणार आहे. त्यामुळे हा रोबोट या टेकफेस्टमध्ये एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.



आइन्स्टाइन रोबोट हा समोरच्या व्यक्तीच्या भावभावना आधी समजून घेतो त्यानुसार तो आपली उत्तर देतो. हा रोबोट समोरच्या व्यक्तीचं लिंग ओळखून त्यानुसार आपली प्रतिक्रिया देतो. एवढचं नाहीतर समोरची व्यक्ती काय विचार करतेय हे देखील ओळखतो आणि त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधतो. सोफिया रोबोट या पहिल्या ह्युमिनाइड रोबोटने आयआयटी टेकफेस्टमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर सोफियापेक्षा अधिक विकसित असलेला आणि भावभावनांचा विचार करून संवाद साधणारा हा आइन्स्टाइन रोबोट असणार आहे. याशिवाय आयआयटी टेकफेस्टमध्ये यावर्षी जगातला पहिला परफॉर्मर ऍक्टर रोबोट देखील भेटीला येणार असल्याने या टेकफेस्टमध्ये आणखी रंगत वाढणार आहे.



यंदा 'तानाजी' रोबोही होणार सहभागी


एकीकडे अभिनेता अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी'ची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा असताना दुसरीकडे रोबो जगतात सुद्धा एका 'तानाजी' रोबोटची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील भुसावळच्या संत गाडगेबाबा अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'तानाजी' रोबोट तयार केला असून 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय विजेत्या ब्राझीलच्या 'जनरल' रोबोला टक्कर देण्यासाठी हा 'तानाजी' रोबो सज्ज झाला आहे. टेकफेस्टमधील लढत लक्षात घेऊन 40 विद्यार्थ्यांनी मिळून तानाजीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, यामध्ये त्याचा वेग वाढविण्यात आला असून अटॅकिंग वेपनचा आकारही बदलण्यात आला आहे.


दरम्यान, आयआयटी मुंबईमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणार्‍या टेकफेस्टमध्ये यंदा 35 देशातील 48 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत ब्राजील, यूएसए, मलयेशिया, साउथ कोरिया, नेपाल, भूटानसह 35 देश सहभागी होणार आहेत. या 35 देशांमधील 48 संघ स्पर्धेमध्ये आपले रोबो उतरवणार आहेत. त्याचप्रमाणे भारतातून तब्बल 50 रोबोट यामध्ये सहभागी होणार आहेत.


संबंधित बातम्या : 


IIT TechFest : आयआयटी टेकफेस्टमध्ये भारताच्या 'तानाजी' रोबोटची जोरदार चर्चा


IIT TechFest : जगातील पहिला अ‍ॅक्टर, परफॉर्मर रोबोट ठरणार आयआयटी टेकफेस्टचं मुख्य आकर्षण