तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे रोजच्या जीवनातील रोबोटिक्सचा वापर आणि वावर सहज झाला आहे. अनेकदा हॉस्पिटल्स, हॉटेल्स, एअरपोर्ट किंवा मोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटच्या मदतीने अनेक कामे पार पाडली जात असल्याने त्याचा वावर दिसतो. मात्र अभिनय करून आपले मनोरंजन करणारा किंवा एखादी कलाकृती सादर करणारा हा रोबोट अनेकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
यु के बेस कंपनीने हा 5 फूट 9 इंच उंच आणि 33 किलो वजनाच्या रोबो थेस्पिअनच्या काही हालचाली या एअर मसल्स व सर्वो मोटरच्या सहायाने नियंत्रित केल्या जातात. मात्र मानवी हालचालीसारखांचं वावर असणारा हा रोबो समोरचा व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? त्याचे वय आणि त्याचे चेहऱ्यावरील हावभाव सहज ओळखू शकतो. कलाकार आणि अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हा रोबो 30 पेक्षा अधिक भाषांमध्ये बोलू शकतो शिवाय 70 हून अधिक विभिन्न प्रकारचे आवाजही काढू शकतो.
त्याचे शारीरिक हावभाव, मोहक हालचाली तसेच भावना व्यक्त करणारे डोळे हे त्याला परिपूर्ण असा चालत बोलता ह्युमनॉइड रोबोट बनविण्यास मदत करतात. त्याच्या शारीरिक हालचालींसोबतची एलईडी लाईट व एलसीडी डोळ्यांमधून शब्दांसोबत व्यक्त होणाऱ्या भावना समोरच्या व्यक्तीला मंत्रमुग्ध करून टाकतात.
दिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे डायलॉग डिलिव्हरी करून त्यात एक्सेप्रेशन्स देणे, डान्स करणे, उत्तमरीत्या गाणे अशा कलांनी परिपूर्ण असल्याने रोबो थेस्पिअन उत्तम कलाकार आणि अभिनेता म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामधील मोशन कॅप्चर सॉफ्टवेअरमुळे तो एखाद्याची हुबेहूब नक्कल करू शकतो सोबतच गर्दीतील चेहरेही तितक्याच सहजरित्या ओळखू शकतो. त्यामुळे हा रोबोट आयआयटी टेकफेस्टमध्ये एका कार्यक्रमात संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
IIT TechFest : आयआयटी टेकफेस्टमध्ये भारताच्या 'तानाजी' रोबोटची जोरदार चर्चा