Sanjay Raut ED Case LIVE: संजय राऊत यांना ईडीकडून अटक

Sanjay Raut ED Case LIVE:  खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पाहा प्रत्येक घडामोडी एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Aug 2022 01:03 AM
संजय राऊत यांना खोट्या केस मध्ये अडकवलं आहे : सुनील राऊत

संजय राऊत यांना खोट्या केस मध्ये अडकवलं आहे. आज करण्यात आलेल्या केसमध्ये पत्राचाळीचा उल्लेख नाही. त्यामध्ये मागच्या ज्या काही 50 लाख रुपयांच्या ट्रांजेक्शन झाले होते त्याचा उल्लेख आहे. संजय राऊत यांची तब्येत व्यवस्थित आहे. आम्ही न्यायालयीन लढा लढणार अहोत. सत्याचा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे, असं संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी वक्त्व्य केलं आहे. 

Sanjay Raut ED Case : संजय राऊत यांना ईडीकडून अटक

Sanjay Raut ED Case : संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांना सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

संजय राऊत यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

संजय राऊत यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कारण, ईडीचे सहसंचालक मुंबईतील ईडी कार्यलयात पोहचले आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबई ईडी कार्यालयात पोहोचले

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान, ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबई ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. सत्यव्रत कुमार दिल्लीहून मुंबईत पोहोचले आहे.

मरेन पण झुकणार नाही, : संजय राऊत

ईडी मला अटक करणार असून कारवाईला मी घाबरत नाही. मरेन पण झुकणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राजकीय सुडबुद्धीने माझ्यावर कारवाई : संजय राऊत

 काही झालं तरी संजय राऊत झुकणार नाही. राजकीय सुडबुद्धीने माझ्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे काहीही झालं तरी शिवसेना सोडणार नाही, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. 

Sanjay Raut: राऊत यांना अटक झाली नाही तर ताब्यात घेतलं आहे: सुनील राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. ईडीचे पथक राऊत यांना वाहनात बसून कार्यलयात घेऊन जात आहेत. मात्र शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांना शांत करण्यासाठी आमदार सुनील राऊत हे घराबाहेर आले असून त्यांनी कार्यकत्यांना शांत राहण्याचं आवाहन करत, राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना अटक झाली नसल्याचे ते म्हणाले आहेत.  

विरोधकांचं तोंड दाबण्यासाठी कारवाया : बाळासाहेब थोरात

ईडीची ही कारवाई अपेक्षितच होती. महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत यांचं मोठं योगदान आहे. - शिवसेनेला असे अनेक धक्के बसत आहेत. संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही सांगता येत नाही.  विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी अशा कारवाया सुरू आहेत. ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते मात्र निर्दोष होत आहेत. लोक सर्व बघात असून लक्षात ठेवत आहेत. लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आहे, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थारात यांनी केलाय. 

ही कारवाई त्यांच्या कडे असलेले पुराव्यावरून होत - केसरकर

ही कारवाई त्यांच्या कडे असलेले पुराव्यावरून होत आहे, त्यामुळे त्यांचा आणि आमचा संबंध नाही, मुद्दाम असे गैर समाज पसरवले जात आहेत. संजय शिरसाट यांचे वक्तव्य आले होते, त्यांची मागणी ती आमची मागणी नाही. तसेच. अमित शाह यांच्या भेटीशी आणि राऊत यांच्यावर होणारी कारवाई यांचा देखील संबंध नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. 

संजय राऊत यांच्यावर ईडीचे कारवाई सुरू झाल्यानंतर नागपुरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

संजय राऊत यांच्यावर ईडीचे कारवाई सुरू झाल्यानंतर नागपुरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे... नागपूरच्या व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत ईडी कारवाईचा निषेध केला आहे...सूड बुद्धीने संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई केली जात असून ईडी केंद्र सरकारच्या हातचा बाहूला बनल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय....

Sanjay Raut ED Case LIVE: मागील 8 तासापासून खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन सुरुच 

मागील 8 तासापासून खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन सुरुच, दादरमधील गार्डन कोर्ट इमारत परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात, इमारतीखाली ३-४ सीआरपीएफ जवान, गार्डन कोर्टमधील २५ व्या मजल्यावर संजय राऊतांचा फ्लॅट, जो ईडीचं जप्त केलाय

मागील 6 तासापासून खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन सुरुच

मागील 6 तासापासून खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन सुरुच, दादरमधील गार्डन कोर्ट इमारत परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात, इमारतीखाली ३-४ सीआरपीएफ जवान , गार्डन कोर्टमधील 25 व्या मजल्यावर संजय राऊतांचा फ्लॅट, जो ईडीचं जप्त केलाय

विकास प्रकल्पाची मोठी कारवाई करायची आहे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde On Sanjay Raut : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना संजय राऊतांवरील कारवाईबाबत विचारलं असता म्हणाले की, विकास प्रकल्पाची मोठी कारवाई करायची आहे. एवढं एकच वाक्य बोलून शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.  

गेल्या 4 तासांपासून ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरु, पत्राचाळ प्रकरणी चौकशी, ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु

उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. गेल्या 4 तासांपासून ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे. पत्राचाळ प्रकरणी ही चौकशी सुरु असल्याचं समजतंय. ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याची माहिती आहे. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जातायत.. . ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावलं होतं. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे राऊत चौकशीला सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीने केलाय., या प्रकरणी ईडी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.. 

राऊतांनी अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार व्हावं- नितेश राणे

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीची अद्यापही चौकशी सुरू आहे, कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. या अगोदर सुद्धा ईडीच्या तीन वेळा नोटीसा संजय राऊत यांना गेल्या होत्या. मात्र हे महाशय वेगवेगळी कारण देऊन पळायचे. पळकूट ज्यांना आपण म्हणतो त्यातील हा एक व्यक्ती आहे. तुम्ही जर कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नसाल तर तीन-तीन वेळा ईडीच्या चौकशी का चुकवता असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. तुम्हाला जे काही सत्य सांगायचे होते ते जर तुम्ही ईडीला जाऊन सांगितलं असतं तर आजची सकाळ खराब झाली नसती. दररोज सकाळी येऊन तुम्ही महाराष्ट्राची सकाळ खराब करायचे आज तुमची सकाळ खराब झाली आहे. काल जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्या स्वप्ना पाटकरांना हेच संजय राऊत ती जमीन आपल्या नावे कर किंवा प्रवीण राऊत यांच्या नावावर कर मग तुमच्यावरील आरोप सिद्ध करण्याची गरज आहे का?. तुम्हाला शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात बोलवत कोण आहे.  त्यामुळे अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार व्हावं, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. 


 


 

यातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधला पाहिजे; राऊतांवरील ईडी कारवाईवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

Raosaheb Danve On ED Action: संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देतांना भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, अशाप्रकारे आरोप जेव्हा तुमच्यावर होत असेल तर त्या आरोपाचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधला पाहिजे. कोणत्याहीप्रकारे यात राजकारण नाही.त्यांनी केलेलं कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी भाजपवर आरोप केला जत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. 

Sanjay Raut ED Case LIVE: दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊतांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी

दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊतांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी, इमारती खाली सीआयएसएफचे जवान तैनात , एप्रिल महिन्यात संजय राऊतांचा हा फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला होता

ED Raid On Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईने आनंद; शिंदे गटाची प्रतिक्रिया





ED Raid On Sanjay Raut : ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील अशी  प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. 


आज सकाळी, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडी पथकाने छापा मारला. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की, राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. राऊत हे प्रवक्ता होते, मास लीडर नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईने मोठा क्षोभ उसळून येणार नाही असेही शिरसाट यांनी म्हटले. ईडीची कारवाई कायद्यानुसार  होत असल्याचेही त्यांनी म्हटले. राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल असेही शिरसाट यांनी म्हटले. अर्जुन खोतकर यांच्याबाबत विचारले असता खोतकर यांचा विषय वेगळा आहे. त्यांनी आपल्या भावना वेगळ्या पद्धतीने मांडल्या असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.


बाळासाहेबांची शपथ घेऊ नये


संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये असेही शिरसाठ यांनी म्हटले. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला असून आम्ही पक्षासाठी 40 वर्ष काम केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल असा टोलाही त्यांनी लगावला. 




 



उद्धवच राऊतांना पक्षाबाहेर काढतील 


एक दिवस उद्धव ठाकरे हेच संजय राऊत यांना पक्षातून बाहेर काढतील असे शिरसाट यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका मांडत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत का असावं याबाबत सातत्याने सांगायचे. त्याचाच हा परिणाम असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.   






Sanjay Raut ED Case LIVE : संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार, साडेतीन तासांपासून राऊतांच्या घरी ईडीकडून चौकशी सुरु

Sanjay Raut ED Case LIVE : ED ऑफिसच्या बाहेर मुंबई पोलिस आणि सीआरपीएफ जवान तैनात,  सुरक्षा व्यवस्था वाढवली

ED ऑफिसच्या बाहेर मुंबई पोलिस आणि सीआरपीएफ जवान तैनात,  सुरक्षा व्यवस्था वाढवली

आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील- अमोल मिटकरी

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, अपेक्षेप्रमाणे ईडी नावाचे पाहुणे  संजय राऊत यांच्या घरी भल्या पहाटे दाखल झाले आणि एक हाती किल्ला लढवणाऱ्या व प्रत्येकवेळी शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई सुरु केली. आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील . राउत इडीला घाबरून भाजपला शरण गेले नाहीत. #wesupportSanjayraut

संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक, तीन तासांहून अधिक वेळ चौकशी सुरु,  संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी, पत्राचाळ घोटाळा प्रकरण

संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक, तीन तासांहून अधिक वेळ चौकशी सुरु,  संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी, पत्राचाळ घोटाळा प्रकरण

ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र - सचिन सावंत

Sanjay Raut ED Case LIVE : संजय राऊत यांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आले

 Sanjay Raut ED Case LIVE : संजय राऊत यांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आले आहेत

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही- संजय राऊत

Sanjay Raut: 'कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही', असं म्हणत संजय राऊतांनी शेअर केलं ट्वीट



Sanjay Raut : संजय राऊत यांचं ट्वीट; म्हणाले,'तरीही शिवसेना सोडणार नाही'



Sanjay Raut Live : संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक

Sanjay Raut Live : संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजी सुरू

Sanjay Raut Live : संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजी सुरू

नेमकं काय पत्राचाळ प्रकरण... 

पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.


प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 

रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं समाधान- आमदार नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं की, रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं समाधान आहे. पत्राचाळीतील लोकांना आता न्याय मिळेल असं वाटत आहे. झुकेगा नहीं वगेरे म्हणणाऱ्यांना आता कळेल. भ्रष्टाचार, महिला अत्याचार करायचा आणि आपल्याला काहीच होणार नाही असं त्यांना वाटायचं. मात्र आता त्यांना कळेल. पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा व्हायलाच हवी. भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल तर तुम्ही कुणीही असलात तरी चौकशी होणारच, असं राणे म्हणाले.

संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार -किरीट सोमय्या 

यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार आहे. संजय राऊतांविरोधात मी पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे. आता कारवाई सुरु आहे. संजय राऊतांची धावपळ सुरु होती, आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Sanjay Raut ED News :  खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली

Sanjay Raut ED News :  खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे.  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलं की, संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालं आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे. 

पार्श्वभूमी

Sanjay Raut ED Case LIVE Updates


खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे.  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलं की, संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालं आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे. 


संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार -किरीट सोमय्या 


यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार आहे. संजय राऊतांविरोधात मी पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे. आता कारवाई सुरु आहे. संजय राऊतांची धावपळ सुरु होती, आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. 


रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं समाधान- आमदार नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं की, रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं समाधान आहे. पत्राचाळीतील लोकांना आता न्याय मिळेल असं वाटत आहे. झुकेगा नहीं वगेरे म्हणणाऱ्यांना आता कळेल. भ्रष्टाचार, महिला अत्याचार करायचा आणि आपल्याला काहीच होणार नाही असं त्यांना वाटायचं. मात्र आता त्यांना कळेल. पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा व्हायलाच हवी. भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल तर तुम्ही कुणीही असलात तरी चौकशी होणारच, असं राणे म्हणाले.


नेमकं काय पत्राचाळ प्रकरण... 


पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.


प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 


संजय राऊतांना ईडीनं का पाठवलं समन्स? 


ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. 


प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. 


सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आलं आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.