मुंबई : मनी लॉन्ड्रिंग कायद्यांअंतर्गत गेल्या काही वर्षात ईडीने विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांची मालमत्ता जप्त केली होती. विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांनी बँकांचे जवळपास 22 हजार 586 कोटीचे कर्ज बुडवले आहे. त्यापैकी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 80.45 टक्के म्हणजेच 18 हजार 147 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यातील काही रक्कम आणि मालमत्ता कर्जदार बँका आणि केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा दणका बसला आहे. या तिघांची मिळून 9371 कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने या तिघांची तब्बल 18 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ही रक्कम बँकाच्या बुडित कर्जाच्या 80 टक्के इतकी आहे.
बँकांचं कोट्यावधी रुपयांचं कर्ज बुडवून हे तिघेही परदेशात फरार झाले होते आणि यांना भारतात आणण्यासाठी आता युद्धस्तरावर तपास यंत्रणांकडून प्रयत्न करत आहेत. या तिघांनी मिळून बँकांचे 22,585.83 कोटी रुपये बुडवले आहेत.
‘ईडी’कडून या तिघांच्याही देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी 969 कोटींची मालमत्ता ही परदेशात आहे. आतापर्यंत सरकारी बँकांना 8441 कोटी रुपये परत मिळाले आहेत. सध्या विजय माल्ल्या न्यायालयीन लढाईत पूर्णपणे गुंतला आहे. तर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रत्यापर्णाच्या हालचालींना वेग आला आहे.
इतर संबंधित बातम्य