ED Raid in Mumbai : बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित (BMC Covid Scam) मुंबईत (Mumbai News) ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी (ED Raids) सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यानंच सुजीत पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं कंत्राट मिळवलं. तसेच यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणा संदर्भात ईडीनं चौकशी केली होती.
मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी सुरू आहे. कोविड काळातील कंत्राटांप्रकरणी इडी चौकशी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कोविड काळात दिले गेलेल्या कंत्रांटांसंदर्भात छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्याही घरी ईडीची धाड
शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे. विविध निवडणुकांमागे पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्या हाती असतात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदेच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे.
प्रकरण नेमकं काय?
कोरोनाच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबईतील दहिसर येथे असंच एक कोविड केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधलं असल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे. त्यासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असं नाव देण्यात आलं होतं.
माहितीनुसार, हे कोविड सेंटर 242 ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आलं होतं. तिथे, दहिसर केंद्रात आणखी 120 रेग्युलर बेड होते. सुजित पाटकर यांना या कामाचं कंत्राट मिळालं होतं. ते चालवण्यासाठी जून 2020 मध्ये डॉक्टरांशी करार करण्यात आला आणि बीएमसीनं कंत्राट दिलं. त्यांच्या घरावर छापा टाकताना अंमलबजावणी संचालनालयाला (ED) एक कागद सापडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. याच आधारे असा आरोप केला जात आहे की, कंत्राट मिळून जवळपास एक वर्षानंतर आणि कंपनीच्या खात्यात 32 कोटी रुपये जमा झाल्यानंतर कोविड परिसरातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी बीएमसीसोबत करार करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :