Cryptocurrency Fraud Cases : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम सेलने देशातील पहिल्या क्रिप्टो चलन संबंधीत फसवणूक झालेल्या पिडिताचे पैस परत मिळवून दिले आहेत. पिडीतने अधिक नफ्याच्या हव्यासापोटी क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले होते. माञ अखेर पिडीत यात फसला गेला. आतंरराष्ट्रीय गुन्ह्याची उकल देशात पहिल्यादांच मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलने केली आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये दिवसेंदिवस अनेकजण गुतंवणुक करत आहेत, माञ यात गुंतवणूक करताना. थोडीशी सावधगिरी बाळगणं गरजेच आहे. मुंबई जवळच्या मिरा रोडमध्ये मोबाईल दुकानाचे व्यापारी योगेश जैन यांना व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्याची ऑफर आली होती. त्यांनी बी.टी.सी ट्रेड इंडिया या ग्रुपमध्ये जॉईंट होवून, बी.टी. कॉईन ऍप डाउनलोड केलं. आणि अँमीच्या सांगण्यावरु पैसे गुंतवू लागला काही दिवस चांगला परतावा आला. माञ त्यानंतर जैन चांगलेच तोटयात गेले. त्यानंतर अँमीने तोटा भरुन काढण्यासाठी तिचा मिञ मार्कचा नंबर दिला. त्याने ही चांगल्या परताव्याची हमी देत. आपणाला नफ्यातून २० टक्के कमिशन देण्याची मागणी केली. आणि मध्येच पैसे काढू शकत नाही, असे सांगितले. जैन यांनी आपल्या खात्यातून १५ लाख टाकले. मिञांकडूनही ५ ते ६ लाख टाकले. असे पैसे टाकत एकूण ३३,६५,६५० एवढे या क्रिप्टोकरन्सीमध्ये जैन यांनी गुंतवले. नफा करोडो मध्ये दाखवत होता. माञ पैसे एका विशिष्ट दिवसानंतर काढायचे ठरले होते. ज्यावेळी रक्कम काढण्याची वेळ आली तेव्हा ते अकाउंटच बंद झालं.
आपली फसवणूक झाल्याच कळताच योगेश जैन यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम सेल कडे मेल द्वारे तक्रार केली. सायबर क्राईम सेलने या तक्रारीची दखल घेत. गुन्हा दाखल केला. आणि या घटनेचा एक वर्ष कसून तपास केला. यात दोन चिनी नागरिकांचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. ते दोघेही हॉंगकॉंग येथून, गुन्हा करत होते. सायबर सेलला तपासात ओकेएक्स (OKX) नावाच्या एका एजन्सीचा तपास लागला. जी एजन्सी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचं काम करत होती. याच तपासा दरम्यान पोलिसांना एका फेक क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा शोध लागला. पोलिसांनी ओकेएक्स एजन्सीशी संपर्क केला असता हा वॉलेट त्याच चीनी नागरिकाचा असल्याचे उघडकीस आले. तसेच, पीडित फिर्यादी व्यक्तीस ज्या मोबाईल नंबरवरुन संपर्क करण्यात आला होता, ते नंबरही हाँगकाँगचे असल्याचे पोलीस तपासात निष्पण झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन चिनी नागरिकां वर 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला, या दोन्ही चिनी नागरिकांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. माञ सायबर क्राईम सेलने याचा पाठपुरावा करत, योगेश जैन याचे संपूर्ण पैसे परत मिळवून दिले आहे.