मुंबई : ईडीने (ED) फेअर प्ले (Fair Play) प्रकरणी 12 जून रोजी मुंबई आणि पुण्यातील 19 ठिकाणी छापे टाकले आहेत. फेअर प्ले ॲपने आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचा आरोप आहे. तसेच नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यान या ॲपचा बेटींगसाठी वापर केल्याचे आढळून आले असल्यानं ईडीनं ही कारवाई केली. झडतीदरम्यान ईडीने,बँक फंड, डीमॅट खातंसह लक्झरी घड्याळ अशी एकूण 8 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे, अशी माहिती ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी आणि तपास सुरु असल्याची माहिती ईडीकडन देण्यात आली आहे.
वायकॉम 18 मीडिया प्रायवेट लिमिटेडनं नोडल सायबर पोलीस, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. आयपीसी 1860, माहित तंत्रज्ञान कायदा,2000 आणि कॉपीराईट कायदा 1957 नुसार फेअर प्ले स्पोर्ट एलएलसी आणि इतरांविरोधात 100 कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन ईडीनं कारवाई केली आहे.
ईडीने तपासा दरम्यान सर्व बँक खाती गोठवली असून ईडीला अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही सापडली आहेत.फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ येथील परदेशी संस्थांद्वारे सेलिब्रिटींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय एजन्सींसोबत करार केले असल्याचेही उघड झाले.
फेअर प्लेने गोळा केलेला निधी अनेक बोगस आणि बेनामी बँक खात्यांमधून घेण्यात आला होता असा आरोप आहे. ईडीनं केलेल्या तपासात आढळून आलं की यामध्ये शेल कंपन्यांच्या कॉम्प्लेक्स वेब ऑफ बँक अकाऊंटचा वापर करण्यात आला.
ईडीनं केलेल्या तपासात आढळून आलं की परदेशातील शेल कंपन्यांनी पैसा पाठवला होता. यामध्ये हाँगकॉग, चीन आणि दुबईतील बेनामी कंपन्यांचा समावेश होता. या प्रकरणात बेनामी आस्थापनांच्या 400 हून अधिक खात्यांचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. फेअर प्लेनं नेमक्या कशा प्रकारे पैसा गोळा केला याची चौकशी सुरु असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.
आयपीएलचं बेकायदा प्रसारण, लोकसभा निवडणुकीदरम्यान बेटिंग
आयपीएलच्या सामन्यांच्या मोबाईल आणि वेबसाईटवरील प्रसारणाचे हक्क जिओ सिनेमाकडे आहेत. मात्र, फेअर प्लेनं बेकायदेशीरपणे त्या सामन्यांचं प्रसारण केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे देण्यात आली होती. याशिवाय या फेअरप्लेवरुन लोकसभा निवडणुकीच्या निकाला दरम्यान ऑनलाईन बेटींग करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, फेअर प्ले प्रकरणात ईडीकडून अधिक चौकशी आणि तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
Mahadev App : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ईडीला मोठे यश, रवी उप्पलला दुबईतून भारतात आणले जाणार
प्रफुल्ल पटेलांना मंत्री व्हायचंय म्हणूनच मिरचीची प्रॉपर्टी सोडवली, संजय राऊतांचा हल्लाबोल