मुंबई : विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.


या भागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला हे परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास 15 हजारांहून अधिक विद्यार्थी 'जेईई-मेन्स'मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचणं अडचणीचे आहे. याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना श्री. सामंत यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असं सामंत यांनी सांगितले.


आज देशभरात जेईई परीक्षा घेतली जाणार असून आज पासून रोज दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षा मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाइन्स नुसार केंद्रावर ही सुरळीतपणे घेण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळपासूनच विद्यार्थी केंद्रावर यायला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी पालकांना मजल दरमजल करत केंद्रापर्यत पोहचावे लागत आहे. दुरून मुंबईच्या केंद्रवर सकळी 7 वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जातोय. यामध्ये कोणी उरण, पालघर, नवी मुंबईहून मुंबईत सकळी पालक आणि विद्यार्थी केंद्रावर पोहचताना अनेक अडचणी सहन करत येताना पाहयाल मिळताय सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 या सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.


परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा एकत्र न बोलवताय ठराविक अर्धा तासाच्या अंतराने काही केंद्रांनी बोलवलं आहे.त्यामुळे सकाळच्या 9 ते 12 सत्रासाठी सकळी 7 पासून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार असून सर्व खबरदारीचे उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जातील. जेईई मेन परिक्षेसाठी केंद्र वाढविण्यात अली असून आधी 570 केंद्र होते ते वाढवून 660 केंद्रावर परीक्षा होणार आहे. शिवाय, विद्यार्थ्यांची एका वर्गातील संख्या सुद्धा 24 हुन 12 करण्यात आलीये. त्यामुळे बॅच सुद्धा वाढविण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


आजपासून JEE परीक्षा, केंद्रांवर पोहोचण्यास परीक्षार्थींची कसरत; पूरग्रस्त विद्यार्थ्याचा हायकोर्टाला ई-मेल