Chaityabhumi : आज  6 डिसेंबर... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन... महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करु नये आणि घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनाने केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर महापालिकेकडून कोरोना चाचणी आणि लसीकरणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. 


मुंबईतल्या चैत्यभूमीवर  काही वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्यानं ते संतापले. पोलीस आणि अनुयायांमध्ये यावेळी झटापट झाली. चैत्यभूमीवर प्रवेश मिळवताच अनुयायांनी तिथेच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी कोणत्याही सोयीसुविधा दिला नसल्याचा आरोपही अनुयायांनी केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना बाहेर काढलं. 


चैत्यभूमीवर बॅरिकेटिंग करण्यात आली असून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. यानंतर चैत्यभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आलीय. दरम्यान काही संघटना प्रसिद्धीसाठी अशी स्टंटबाजी करत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी अनुयायांना शांततेचं आवाहन केलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे येत असतात. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्याशिवाय अनेकांनी घरातूनच अभिवादन करण्याचे ठरवले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :