मुंबई :  मुंबई महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मुंबई महापालिकेने अखेर बोनस जाहीर (BMC Declare Bonus) केला आहे. दिवाळी बोनस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालिका आयुक्तांची बैठक झाली. त्यानंतर बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना 26 हजार रुपये इतका बोनस जाहीर केला आहे. तर आरोग्य सेविकांना एका महिन्याची पगार बोनस म्हणून मिळणार आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनादेखील 26 हजार रुपये इतका बोनस मिळणार आहे. 


दिवाळी बोनसच्या मागणीबाबत कर्मचारी संघटनांची मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह यांची मुख्यमंत्र्यांसोबत सानुग्रह अनुदान मिळावं यासाठी बैठक पार पडली. 


मागील वर्षी 22, 500 रुपये इतका दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. यावर्षी 30 हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी कर्मचारी कामगार संघटना समन्वय समितीने केली होती. त्यामुळे मुंबई महापालिका किती बोनस जाहीर करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मागील वर्षी 22 हजार पाचशे रुपये बोनस मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मिळाला होता. यंदाच्या वर्षी या बोनस मध्ये साडेतीन हजारांची वाढ करत 26 हजार रुपये बोनस दिला जाणार आहे


ठाणे महानगरपालिकेकडून 21,500 हजार रुपयांचा बोनस 


. ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus)  भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.  गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. 



कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :