मुंबई : मुंबई महापालिकेच्या ज्या स्थायी समितीमध्ये देवनार डंपिंग ग्राउंडवर वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी मिळाली त्यावरून आता सेना-भाजपमध्ये नवा वाद उभा राहिला आहे. भाजपने वीज निर्मिती प्रकल्पामध्ये घोटाळा झाल्याचा थेट आरोप करत घुमजाव केलाय. आधी या प्रस्तवाला संमती मग नंतर विरोध अशी भाजपची स्थिती झाली आहे. तर सेनेने भाजपच्या नेत्यांना त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्याचं म्हंटलय.


मुंबई महापालिकेच्या देवनार डंपिंग ग्राऊंडवरील 600 मेट्रिक टनांवर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यासाठी कंत्राट मागविण्यात आले. या कंत्राटात दोन निविदा आल्या. मात्र, या निविदेतील सर्वाधिक रक्कम दिलेल्या मे. सुएज एनव्हायरमेंट डंडिया प्रा. लि. कंत्राटदारांपैकी चैन्नई प्रा. लि. कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. स्थायी समिती बैठकीत या प्रस्तावाला सेना, काँग्रेसच्या सुरात सूर मिसळणाऱ्या भाजपने स्थायी समिती बैठकीत प्रस्ताव मंजूर करताना सेनेच्या सोबत सुरात सूर मिसळला होता. मात्र, आता प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपने विरोध दर्शवलाय. भाजप मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी भाजपच्या नगरसेवकांची कानउघडणी करत हा प्रस्ताव रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी केली आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांना घुमजाव करावा लागलाय. भाजपने हा 1270 कोटींचा घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे.

मालमत्ता कर वसूलीसाठी पालिकेची दवंडी, पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई

देवनार डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आणि त्यातून वीज निर्मिती करण्यासाठी स्थायी समिती बैठकीसमोर तब्बल एक महिन्यानंतर हा प्रस्ताव सेनेने आणला होता. स्थायी समिती बैठकीत यावर एक तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यात भाजपचे नगरसेवकही उपस्थित होते. भाजपने यावेळी विरोध का केला नाही? असा सवाल सेनेने केला आहे. भाजपच्या नेत्यांना आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नाही का? असा सवाल देखील सेनेने केलाय.

मुंबईतला कचरा साफ करण्यासाठी राबवणार इंदौर मॉडेल

काय आहे नेमका प्रकार?
मुंबई महापालिकेने देवनार डंपिंग ग्राउंडवर वीज निर्मिती करण्यासाठी निविदा मागविल्या. यामध्ये मे चेन्नई एम.एस.डब्ल्यू प्रा.लि. आणि मे. सुएज एनव्हायरमेंट डंडिया प्रा. लि या दोन कंपनीच्या निविदा आल्या. मे चेन्नई एम.एस.डब्ल्यू प्रा.लि.ने 648 कोटी रक्कम तर मे. सुएज एनव्हायरमेंट डंडिया प्रा. लि कंपनीने 821 कोटी रक्कम निविदेत भरली. निविदा प्रक्रियेतील अंतिम सी-पाकीट उघडले असता सुरुवातीला मे चेन्नई एम.एस.डब्ल्यू प्रा.लि. कंपनीने शून्य रक्कम भरली होती. निविदा प्रक्रियेत रक्कम न आल्याने दोन नंबर असलेली मे. सुएज एनव्हायरमेंट डंडिया प्रा. लि कंपनीला कंत्राट देण्याची तयारी करण्यात आली. महापालिका अधिकाऱ्यांनी निविदा भरणाऱ्या पहिल्या मे चेन्नई एम.एस.डब्ल्यू प्रा.लि बोलवत दुसऱ्या कंपनीपेक्षा कमी रक्कम भरण्यास सांगितले. आणि मे चेन्नई एम.एस.डब्ल्यू प्रा.लि या कंपनीला कंत्राट देण्याचा प्रस्ताव आणला.
आता देण्यात आलेले हे टेंडर हे 1270 कोटींच आहे. देवनार डंपिंग ग्राउंडवर वीजनिर्मिती करायला अखेर सात वर्षांनंतर स्थायी समितीकडून मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी दररोज 600 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार असल्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही सुटणार आहे. या प्रस्तावात पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा आरोप करीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी संशय व्यक्त केला. हा प्रकार म्हणचे मर्जीतील कंत्राटदाराला संधी देण्यासाठी केल्याचा आरोप सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला.

Increasing Temperature | वातावरणातील बदलामुळे मुंबई-पुणेकर हैराण, कमाल तापमानाचा पारा 35 अंशावर जाण्याची शक्यता