मुंबईतील आझाद मैदान इथं गेल्या 24 दिवसांपासून मराठा तरुणांचं आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांची आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदान येथं भेट घेतली. भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. मला खरेतर या सरकारची किव येते. हे सरकार संवेदनशून्य आहे. फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यात कुठेही आंदोलन होत असेल तर दोन ते दिवसांमध्ये आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले जात होते. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नसून त्यांनी राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला न्याय दिला. कोर्टात टिकेल असं आरक्षण फडणवीस सरकारनेच दिलं.
मंत्र्यांसोबत बैठकीला भलत्याच मुलांना नेतात, घुसखोरांवर कारवाई करा, मराठा आंदोलक तरुणांची मागणी
महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाची काळजी नाही : दरेकर
सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणा संबंधी सुनावणीवेळी सरकारकडून कोणीही उपस्थित नव्हतं. यावरुन सरकारला मराठा समाजाची किती काळजी आहे, हे दिसतं असल्याची टीका दरेकर यांनी केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या सरकारने साजरी केली, त्या छत्रपतींच्या रयतेची काळजी या सरकारला दिसत नाही. 24 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण-तरुणी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांची दखल या सरकारने अद्याप घेतली नाही. यांच्याकडे पाहायलाही या सरकारला वेळ नाही. मराठा समाजाने आपली शक्ती शांततेच्या मार्गाने दाखवली. त्याची दखल तत्कालीने सरकारने घेत कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण दिलं. मात्र, या सरकारने या समाजाची दखल घेतली नाही. तर, पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.
अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
गेल्या 24 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या प्रश्नाकडे लक्ष दयायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही हे दुदैर्व आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जर मराठा समाजाच्या उमेदावारांच्या प्रश्नाला न्याय नाही मिळाला तर येत्या 24 फेब्रुवारी पासून सुरु होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
Maratha Andolan | 24 दिवसांपासून आझाद मैदानात मराठा तरुणांचं आंदोलन, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आंदोलकांच्या भेटीला