मुंबई : एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, अभिनेता श्रेयस तळपडे, रणजित डिसले सर उपस्थित होते. डिजिटल माध्यमांच्या सध्यस्थितीबाबत बोलताना प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं की, डिजिटल माध्यमांचा केंद्र सरकारला खुप फायदा झाला आहे. कोरोना काळात याची प्रचिती सर्वाधिक आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या किंवा अनेक महत्त्वाच्या बैठका ऑनलाईन माध्यामातून पार पडल्या. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन डिजिटली करणे शक्य झालं आहे. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार रोखण्यातही डिजिटल माध्यमांमुळे मदत झाली आहे.


माजी पंतप्रधान राजीव गांधी सांगायचे केंद्र सरकारने 100 रुपये पाठवले की तळातळापर्यंत पोहोचेपर्यंत ते खुप कमी व्हायचे. मात्र डिजिटल माध्यमांच्या वापरामुळे शेतकरी आणि जनतेसाठीच्या योजनांचे पैसे थेट लोकांपर्यंत पोहोचू लागले आहेत, त्यामुळे भ्रष्टाचारही कमी झाला आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं. डिजिटल माध्यमामुळे नोकरी करणारे बँकेत जाऊन पेसै काढत नाहीत. सगळे व्यवहार ऑनलाईन शक्य झाले आहेत. सगळे हिशेब त्यामुळे चोख झाले आहेत. 


BLOG Majha : एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर, यशोधन जोशी, कौस्तुभ मुद्गल यांचे ब्लॉग प्रथम 


राज्यात आयटी टास्क फोर्सचा चेअरमन असताना मी काही महत्वाची पावलं उचलली. आधी जमीन व्यवहारांच्या रजिस्ट्रेशनसाठी कच्ची पावती मिळत होती. त्यानंतर काही वर्षांनी पक्की पावती मिळत असे. मात्र सीडॅकच्या मदतीने आम्ही डिजिटल कार्यप्रणाली विकसित केली. त्यामुळे काही दिवसात जमीन व्यवहारांची पक्की पावती मिळू लागली. यामुळे कामकाजात पारदर्शकता आली, असा अनुभव प्रकाश जावडेकर यांनी सांगितला. 


शिक्षणामध्ये सुद्धा डिजिटल माध्यमांचा खुप फायदा झाला. कोरोना काळात याचा अनुभव सर्वांनी घेतला. शाळा बंद असल्याने अनेक शाळांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने सुरु होते. काही परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. शिक्षणमंत्री असताना मी आढावा घेतला, त्यावेळी राज्यातील अनेक शिक्षकांनी डिजिटल शिक्षणाची सुरुवात केली होती. स्वत:हून अनेक अॅप्स तयार केली. त्यामुळे केंद्र सरकारने दीक्षा प्लॅटफॉर्म तयार केला. ज्यामुळे खुप सारी माहिती एकाचा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली असं, प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. 


केंद्र सरकारने घातलेल्या ओटीटी नियमांमुळे तक्रारी लवकरात लवकर सोडवता येणे शक्य होईस. टीव्हीला जो नियम आहे तो आता ओटीटी प्लटफॉर्म्सना असणार आहे. हा स्वातंत्र्याचा संकोच नाही, समाज स्वास्थ टिकवण्यासाठी हे केलं आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. काही वर्षांपूर्वी लेख लिहायला वृत्तपत्रांमध्ये जागा मिळत नव्हती आता, अनेकांना व्यासपीठ मिळालं आहे. लोकांना आपली प्रतीभा आणि म्हणणं मांडण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. मात्र डिजिटल माध्यातून देशांचं काही नुकसाना होऊ नय़े, इतर राष्ट्रांशी संबंध खराब होऊ नये, याची खबरदारी म्हणून नवे नियम आहेत, असं प्रकाश जावडे यांनी म्हटलं.