मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉलच्या) न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा 19 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले. आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेताना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू, नये असेही संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितलं.
3 ऑक्टोबरपासून आयडॉलच्या परिक्षेला सुरुवात झाली. मात्र, परीक्षा पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता आली नाही. शिवाय, 6 ऑक्टोबरला परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा साइटवर सायबर अटॅकमुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या बिल्डिंग समोर गोंधळ घातला. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलत लवकरच या परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. परंतु, आज परीक्षा मंडळाच्या या बैठकीत आयडॉलच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे होऊ न शकलेल्या परीक्षा व व पुढील सर्व परीक्षा 19 ऑक्टोबर पासून विद्यापीठ घेणार असल्याचं सांगण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, तांत्रिक अडचणींमुळे पेपर पुढे ढकलला
परीक्षा 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. परीक्षामध्ये झालेल्या तांत्रिक अडचणींवर स्पष्टीकरण देताना विद्यापीठाने काल सायबर अटॅकमुळे पेपर ऑनलाइन घेताना अडचणी आल्याच सांगितलं. त्यामुळे पुढील परीक्षेत या तांत्रिक अडचणी येणार नाहीत यासाठी विद्यापीठ पूर्णपणे प्रयत्न करत असून पर्यायी व्यवस्था अवलंबणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रमात न राहता चिंता न करता आपला अभ्यास सुरू ठेवावा असं विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
Web Exclusive | परीक्षार्थी MPSC ची रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्याची मागणी का करतायेत?