मुंबई : आजपासून मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान आज पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेला दुपारी 1 वाजता सुरवात होणारी मात्र लिंक मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीला सामोरे जावं लागलं. याबाबत विद्यापीठाच्या हेल्पलाइन नम्बरला कॉल करून सुद्धा कोणातच प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट कलिना विद्यापीठ गाठून आयडॉल इमारती समोर गोंधळ घातलेला पाहायला मिळाला. सलग दुसऱ्या पेपरला तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला.
अंतिम वर्ष परीक्षेचा पहिला पेपर 3 ऑक्टोबरला होता. त्या पेपर दरम्यान सुद्धा तांत्रिक अडचणी आल्याने हा पेपर पुढे ढकल्याने आता तरी पुढील परीक्षा व्यवस्थित देता येईल या विचाराने आज परीक्षेला विद्यार्थी ऑनलाइन मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर घेऊन बसले. पण परीक्षेसाठी मिळालेली लिंक ओपन होत नसल्याने विद्यार्थी हताश झाले. तर काही विद्यार्थ्यांची लिंक ओपन झाली मात्र लॉग इन होत नसल्याने परिक्षेचा आता काय होणार ? असा प्रश्न पडल्याने हेल्पलाइन नम्बरवर कॉल करण्यास सुरुवात केली पण तिथे सुद्धा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतापून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेत गोंधळ घातला
सुरवातीला तांत्रिक अडचणी दूर करण्याचा आम्ही काम करत असल्याचं सांगत विद्यापीठाने परीक्षा उशिरा सुरू करण्याचे ठरविले पण ही तांत्रिक अडचण लवकर सोडविणे कठीण असल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून लवकरच या आजच्या परिक्षेबाबतचा वेळापत्रक जाहीर केल जाणार असल्याच विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.