मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली आहे. या महिलेने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी 2006 पासून मधली काही वर्ष सोडली तर माझा वापर केला आहे. या दरम्यान त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या परिस्थितीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे, असा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे.
मी तुझं आयुष्य घडवेल, तुझी स्वप्न पूर्ण करेल. मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्याशी लग्न करेल, अशी खोटी आश्वसनं देऊन धनंजय मुंडे यांनी माझा वापर केला. मी माझ्या तक्रारीत देखील नमूद केलं आहे की, माझे आक्षेापार्ह फोटोज, व्हिडीओज् त्यांच्याकडे आहेत. मला सामान्य व्यक्ती म्हणून जगायचं नव्हतं, हे त्यांना माहिती होतं. याच माझ्या परस्थितीचा त्यांनी फायदा घेतला. मात्र माझे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्याकडे असल्याने मी एवढे दिवस गप्प होते, असं या महिलेनं म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आम्ही तक्रार दाखल करायला गेलो त्यावेळी आम्हाला चार ते पाच तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं. मीडिया आली त्यावेळी आमची तक्रार नोंदवण्यात आली.
भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना महिलेने म्हटलं की, कृष्णा हेगडे यांचा मी आदर करते. प्रताप सरनाईक यांच्या बर्थडे पार्टीत मी त्यांना भेटली होती. त्यावेळी त्यांनी स्वत: पुढे येऊन माझ्याशी बोलले होते. मात्र आता ते असं का बोलत आहेत मला माहिती नाहीत. कदाचित धनंजय मुंडे यांचे ते मित्र असल्याने असं बोलत असतील. या दरम्यान महिलेने कृष्णा हेगडे यांच्याशी झालेले व्हॉट्सअॅप चॅट दाखवले.
मनिष धुरी यांनी आरोप सिद्ध करावे
मनिष धुरी यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना महिलेनं म्हटलं की, मी स्वत: कामानिमित्त मनिष धुरी यांची भेट घेतली होती. टेलिव्हिजन कॉर्पोरेशनद्वारे माझं एक गाणं रिलीज होणार होतं. मात्र त्यांनी माझं गाणं ठेवून घेतलं होतं, मात्र ते रिलीज करत नव्हते किंवा परत करतही नव्हते. या विषयासंबंधी मी मनिष धुरी यांची मदतीसाठी भेट घेतली होती. त्यानंतर ते रोज मला दारु पिऊन फोन करत होते. मनिष धुरी चुकीच्या गोष्टी सांगत आहे. मी त्यांना कधीही ब्लॅकमेल केलेलं नाही. मी चुकीची असेल तर त्यांनी सिद्ध करावं की मी त्यांना ब्लॅकमेल केलं, असं आव्हान या महिलेनं दिलं.
Sharad Pawar | Dhananjay Munde प्रकरणी एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने चौकशी करावी : शरद पवार