मुंबई : लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे सध्या अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. धनंजय मुंडे यांनी समाजापासून आपल्याला आणखी दोन मुले असल्याची माहिती दडवून ठेवली. निवडणुकीपूर्वी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्याबाबत खोटी माहिती दिली. असा आरोप करत धनंजय मुंडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या. अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी जनशक्ति संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
'तुमची इच्छा असेल तर मी मागे हटते', धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेची माघार!
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं लैंगिक अत्याचाराच्या आरोप केला. त्याला उत्तर देताना मुंडे यांनी एका अन्य महिलेशी परस्पर सहमतीनं विवाहबाह्य संबंध ठेवले. त्यातून आपल्याला दोन अपत्य असल्याची कबुली समाजमाध्यमावर दिली. त्यांची सर्वस्वी जबाबादारीही त्यांनी स्वीकारली असल्याचं मुंडे यांनी कबूल केलं. मात्र मुंडे यांनी साल 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नामनिर्देश अर्जामध्ये या दोन मुलांची माहिती दडवली आहे. त्यात त्यांनी आपल्याला केवळ दोन मुली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी जयश्री मुंडे असतानाही अन्य पासून एक मुलगा आणि एक मुलगी दोन अपत्यं असल्याने मुंडे यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी आयपीसी कलम 420 आणि 125 (अ)अन्वये निवडणूक आयोगासमोर खोटं प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्या, अशी मागणी या याचिकेतून केली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, भाजपची मागणी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार
"प्यार किया तो डरना क्या.? शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेची पाठराखण
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?
Dhananjay Munde : बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंची माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले...
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार