शिवाय सध्या उपहारगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, तेव्हा हॉटेलमध्ये ग्राहक तरी कसे येणार? असं देखील शेट्टी यांनी म्हंटल आहे. सध्या मुंबईत असणारी हॉटेल व्यवसायिकांची ' आहार' ही संघटना या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याचं देखील शेट्टी म्हणाले.
गेले तीन महिने हॉटेल, उपहारगृह बंद आहेत. परिणामी त्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. यासोबतच हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायिकांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती.
रेस्टॉरंट्स आणि डायनिंग हॉल्सबाबत आठवडाभरात निर्णय?
उपहारगृहे आणि मोठ्या हॉटेलांमधे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे शक्य होईल. या दृष्टीने कार्यपद्धती तयार करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर लगेचच सरकारने निवासाची व्यवस्था असलेली हॉटेल, गेस्ट हाऊस तसेच लॉज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाबाबत हॉटेल व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हॉटेल व्यवसायिक प्रशांत शेट्टी म्हणाले की, सध्या असे अनेक हॉटेल व्यवसायिक आहेत. जे भाड्याने हॉटेल चालवायला घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. मागील साडे तीन ते चार महिन्यांपूर्वी लॉकडाऊन जाहिर झालं आणि या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला. त्यानंतर आता परवानगी देण्यात आली आहे. परंतु यामध्ये छोट्या व्यवसायिकांचा विचार केला नसल्याचं दिसत आहे. 33 टक्क्यांच्या नियमानुसार आमचे व्यवसाय सुरू होणं अशक्य आहे. अगोदरच हॉटेलचे भाडे, बँकेचे हफ्ते, प्रॉपर्टी टँक्स थकलेले आहेत. त्यामुळे आता व्यवसाय सुरू करून देखील उपयोग नाही. त्यामुळे शासनाने 100 टक्के व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी.