Dasara Melava At Shivaji Park: दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात (Shiv Sena Vs Shinde Group) जोरदार सामना सुरु आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) कुणाचा दसरा मेळावा होणार यावरुन दोन्ही गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. असं असताना बीकेसी मैदानाची लढाई शिंदे गटाने जिंकली आहे. शिवसेनचे ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज पालिकेच्या जी उत्तर ऑफिसला भेट देणार आहेत.आज दुपार नंतर शिवसेनेच शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती आहे.
कंपनीचं शिंदे गटाशी काही कनेक्शन आहे का? याच्याही चर्चा
दसरा मेळाव्यासाठी बीकेसीमधील (BKC) एक मैदान शिंदे गटाने आरक्षित केलं आहे. तर बीकेसीतील कॅनरा बँकेजवळील दुसऱ्या मैदानासाठी ठाकरे गटाने केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. कारण हे मैदान कॉलिन्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मैदान बुक करण्यात आलं आहे. या कंपनीच्या मागणीमुळे शिवसेनेचा पर्याय हुकल्याचं बोललं जात आहे. या कंपनीचं शिंदे गटाशी काही कनेक्शन आहे का याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेनं आता शिवाजी पार्क मैदानासाठी आरपारच्या लढाईचा पवित्रा घेतलाय. परवानगी मिळाली तर ठीक अन्यथा थेट शिवाजी पार्कात मेळावा घेण्याचा निर्धार शिवसेनेनं व्यक्त केला आहे. तसंच पालिकेनं या संदर्भात 24 तासात निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचं शिष्टमंडळ आज सकाळी पालिकेच्या जी-उत्तर कार्यालयावर धडकणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क कुणाला मिळणार याकडं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचं ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज पालिकेच्या जी उत्तर ऑफिसला भेट देणार
शिवसेनेचे ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज पालिकेच्या जी उत्तर ऑफिसला भेट देणार आहेत. आज दुपारनंतर शिवसेनेचं शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती आहे. दसरा मेळाव्याबाबत अद्याप परवानगी न मिळाल्यामुळे शिवसेना नेते पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. दसरा मेळावा मैदानाच्या परवानगीसाठी दोन्ही गटाकडून अर्ज आल्याने परवानगी कोणाला द्यावी असा प्रश्न मुंबई महापालिका अधिकाऱ्यांसमोर आहे. तसेच शिवसेना प्रकरणी शिंदे आणि ठाकरे यांचा वाद सुप्रीम कोर्टात असून, यावर निर्णय येणे प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आज ठाकरे गट पालिकेत भेट घेणार आहे, त्यामुळे परवानगी प्रकरणी आता नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar : शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरेंसाठी शरद पवारांची बॅटिंग