CM Eknath Shinde News: राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बदल्यांना स्थगितीसंदर्भात देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी थेट उत्तर दिलं आहे. निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना स्थगिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये होते, त्यावेळी 20 ते 30 टक्के बदल्या होतात, या नियमानुसारच बदल्या होतील असे सांगतानाच निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना कोणतीही स्थगिती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


पदोन्नतीचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावा
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ त्यावर निर्णय घेऊन अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पदोन्नतीसाठी पात्र असतानाही केवळ प्रशासकीय दिरंगाई होत असेल तर ते संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यावर अन्यायकारक ठरेल, म्हणून पदोन्नतीचे प्रस्ताव प्रत्येक विभागाने मार्गी लावावेत, सामान्य प्रशासन विभागाने त्याचा आढावा घेण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 


जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरवण्याचे आवाहन


राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर 27 सप्टेंबर रोजी पुकारलेले ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने जाहीर केले आहे. 2005  नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा विषय तत्कालिन राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीच्या कार्यकक्षेत अंतर्भूत करण्याच्या संदर्भाने बैठकीत चर्चा झाली.   


बैठकीत बक्षी समितीच्या खंड-2 अहवालाची अंमलबजावणी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत ग्रेड पे ची मर्यादा, महसूल विभाग वाटप, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, सेवानिवृत्ती उपदान अथवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा केंद्राच्या धर्तीवर 20 लाख रुपये करणे, गट विमा हप्त्यामध्ये सुधारणा, वाहतूक भत्ते, विमाछत्राचे हप्ते कमी करणे, वाहन खरेदी अग्रीमात वाढ, महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या आदी  विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. 



इतर महत्वाच्या बातम्या


रस्त्याच्या दुरवस्थेमुळे Mumbai-Nashik Expressway LTD कंपनीला तब्बल 1 कोटी 8 लाखांचा दंड ठोठावला


Prajakt Deshmukh : नाशिक-मुंबई महामार्ग नसून छळमार्ग, 'वाट दिसु दे गा'; असं म्हणत लेखक प्राजक्त देशमुख यांनी व्यक्त केला संताप