BMC Coronavirus Guidelines : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 50 च्या आत आलेली दैनंदिन रुग्णसंख्या 500च्या पुढे पोहचली आहे. त्यातच आता पावसाळा येत आहे, त्यामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण आणखी वाढेल.. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाकडून नवे निर्देश काढले आहेत. यामध्ये कोरोना टेस्टिंग पासून पुन्हा एकदा वॉर्ड रुम सक्रीय होणार.. इथपर्यंत सर्व तयारी बीएमसीने सुरु केली आहे... मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी वर्षा निवासस्थावर बैठक पार पडली. त्यातील चर्तेनंतर बीएमसीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्देश दिले आहेत.
- मुंबईतील कोरोना चाचणीची संख्या युद्धपातळीवर वाढवण्यात येणार आहे. तसेच टेस्टिंग लॅब आणि कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करावी...
- १२ ते १८ वयोगटातील लसीकरण वाढवावे, तसेच बुस्टर डोसची संख्याही वाढवावी.
- जंबो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अलर्ट करावेत.
- मालाड येथील जंबो कोविड सेंटर प्राधान्यानं सज्ज होणार
- वॉर्ड वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होणार
- खाजगी रुग्णालयांनाही अलर्ट
- मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रतेयक रुग्णालयात आपातकालीन स्थितीची सज्जता आहे की नाही याबाबतचा आढावा घेतला जाईल.
- मास्कबाबत टास्क फोर्स कडून निर्देश येईपर्यंत अद्याप कोणताही निर्णय नाही. टास्क फोर्सच्या निर्णायानंतर मास्कवर निर्णय घेण्यात येईल.
मे महिन्याच्या मध्यानंतर मुंबईत रुग्णसंख्यावाढीला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. मुंबईत 16 मे रोजी गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी 74 रूग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
31 मे - 506 मृत्यू-0
30 मे -318 मृत्यू-0
29 मे- 375 मृत्यू-0
28 मे -330 मृत्यू-0
27 मे- 352 मृत्यू-0
26 मे - 350 मृत्यू -0
25 मे-218 मृत्यू 0
24 मे- 218 मृत्यू -०
23 मे- 150 मृत्यू -०
22 मे -134 मृत्यू -०
21 मे - 198 मृत्यू-०
मंगळवारी मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर, 2526 सक्रिय रुग्ण
मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 218 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2526 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2355 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.029% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2526 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 297 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 413 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 17, रायगड 83, पालघर 29, रत्नागिरी 15 आणि नागपूरमध्ये 21 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.