मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रात्री या घटनेची पाहणी केली. यावेळी तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, "हा पूल 100 टक्के धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल समोर आला आहे." दरम्यान तावडे यांनी या घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आश्वासनदेखील दिले आहे.




तावडे म्हणाले की, "या पुलाची काही दुरुस्ती गरजेची होती. परंतु त्यासाठी पुलाचा वापर करणे बंद करायला हवे होते की नव्हते, याचा तपास करणार आहोत. तसेच हा पूल कोणी बांधला? पुलाच्या देखरेखीचे काम कोणाकडे होते? या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासनदेखील तावडे यांनी यावेळी दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पूल कोसळल्याने या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक 36 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू (35) , रंजना तांबे (40 ), जाहीद सिराज खान (32) यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतक महिला जीटी हॉस्पीटलच्या कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जीटी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

PHOTOS : सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे

VIDEO