मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला.
मुलगा अर्जुनसह सचिनने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत आज पहाटे पाच वाजता हाती झाडू घेऊन स्वच्छता केली.
या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केलं.
मोदींनी आपल्या वाढदिनी म्हणजेच 17 सप्टेंबरला, देशातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. इतकंच नाही तर मोदींनी देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पत्र लिहून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानुसार सचिन तेंडुलकरने आज या अभियानात हजेरी लावली.
मोदींच्या पत्राला रहाणेचं उत्तर
नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या या शिलेदाराला आमंत्रण पत्र लिहिलं होतं. या पत्रात मोदींनी रहाणेला ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
त्याचं उत्तर देताना रहाणेने लिहिलं की, “आदरणीय नरेंद्र मोदी जी, तुमचं पत्र मिळाल्याने मी फारच आनंद आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभागी होणं ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे.”
संबंधित बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राला अजिंक्य रहाणेचं उत्तर