मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंगापूर दौऱ्यावर
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2017 07:35 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत. पहिल्याच दिवशी ह्योसंग केमिकल्स, सॅमसंग, ह्युंदाई हेवी इंजिनिअरिंग आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स आदी उद्योग समुहांच्या प्रतिनिधींसोबत शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री यावेळी महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देणार आहेत. त्यानंतर ते कोरियाच्या उद्योजकांशी चर्चा करतील. राज्यातील विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीसह परकीय गुंतवणुकीबाबत बैठका होतील. शिष्टमंडळात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदींचा समावेश आहे.