Mumbai Corona Update :  बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. बुधवारी मुंबईत 1,128 कोरोना रुग्ण आढळले होते. आज, गुरुवारी यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मुंबईत 827 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1366 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,22,292 इतकी झाली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 97 टक्केंवर पोहचला आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 7601 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 623 दिवसांवर आला आहे.  मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.11% टक्के इतका झालाय.  मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झालाय. 






सध्या मुंबईतील 3 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 827 रुग्णांपैकी 105 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 279 बेड्सपैकी केवळ 1 हजार 768 बेड वापरात आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha