मुंबई: मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी आता मुंबई पार्किंग अॅथोरिटी नेमण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे. पार्किंगसाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर असणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल म्हणाले की, मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सोडवण्याकरता मुंबई पार्किंग अॅथॉरिटी नेमण्यात येणार आहे. मोठ्या इमारतीतील पार्किंग, जिथे काही वेळाकरता जागा खाली असेल तेवढ्या वेळात बिल्डिंग अॅथॉरिटी आणि मुंबई पार्किंग अॅथॉरिटी यांच्या माध्यामातून पार्कींग करता येणार आहे. अशा प्रकारे पार्किंगसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण 'शिवयोग केंद्र' असं नामकरण करण्यात आलं आहे. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील 3500 उपहारगृहांना कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. सन 2022-2023 चा 45 हजार 949.21 कोटींचा आणि 8.43 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
संबंधित बातम्या:
- मुंबई पालिकेचं 'इलेक्शन बजेट! महापालिकेचा अर्थसंकल्प 45 हजार 949 कोटींचा; शिक्षण, आरोग्यावर भर
- BMC Education Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; शिक्षणासाठी 3370 कोटींची तरतूद
- BMC Budget 2022 : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बीएमसीचं 'सर्वांसाठी पाणी' नवं धोरण, अर्थसंकल्पात विशेष तरतूदी