Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी 288 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येतील घट आजही कायम राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 288 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 532 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 677 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1397 दिवसांवर आला आहे. शनिवारच्या तुलनेत यामध्ये तब्बल 124 दिवसांची वाढ झाली आहे.


याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन 0.05% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तसंच आज नव्याने सापडलेल्या 288 रुग्णांपैकी 35 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 889 बेड्सपैकी केवळ 1 हजार 027 बेड वापरात आहेत.



राज्यात 3 हजार 502 नवे कोरोनाबाधित


मुंबईसह राज्यातील एकूण रुग्णसंख्याही उतरणीला लागली आहे.  राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 45 हजार 905 ॲक्टिव रुग्ण आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 76,49,669  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.54 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आत 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,64,37,416 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी  78,42,949 (10.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 94 हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,380 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


 इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha