Mumbai Corona Update : कोरोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्येही कोरोनारुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत घट होत आहे. मागील दोन दिवस रुग्णसंख्या 30 हून कमी आढळली असताना आजही नवे 28 रुग्णच आढळले आहेत. नवे कोरोनाबाधित कमी आढळत असल्याने पालिकेसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 28 कोरोनाबाधित आढळले असून 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 299 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 28 रुग्णांपैकी एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 495 बेड्सपैकी केवळ 38 बेड सध्या वापरात आहेत.
राज्यात 99 नवे कोरोनाबाधित
मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात 99 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,72,512 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात 180 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77,23,468 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. सकारात्मक बाब म्हणजे, राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे. तर राज्यात सध्या एकूण 1,273 सक्रीय रुग्ण आहेत.
हे ही वाचा -
- Maharashtra Corona Update : 36 ठिकाणी एकही कोरोना रुग्ण नाही, राज्यात आज 99 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
- Corona Virus : कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक
- Corona : एक कोरोना पेशंट सापडला तर 'या' देशात लॉकडाऊन, बॉर्डरही केल्या सील...!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha