ठाणे : ठाणे महानगरपालिकेने एका खाजगी लॅबवर कारवाई केली आहे. या लॅबमधून आणलेले पाच जणांचे covid-19 चे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते मात्र त्यानंतर महानगरपालिकेने केलेल्या चाचणीत तेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. थायरो केअर नावाची ही खाजगी लॅब आहे. या लॅबला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्या न करण्याचे आदेश एका नोटीस द्वारे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
मुंब्रा येथे राहणारे समीर खान यांचे कुटुंब आहे. या कुटुंबात आधारस्तंभ असलेल्या त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यामुळे घरातील एकूण बारा जणांची चाचणी थायरोकेयर या खाजगी लॅब मधून समीरने करून घेतली. त्यासाठी त्याने 36 हजार रुपये मोजले. ज्यावेळी या चाचणीचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह असल्याचा निदर्शनास आले. त्यांच्या घरी थेट महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना घेऊन जाण्यास आले. त्यानंतर विलगीकरण कक्षात असताना ठाणे महानगरपालिकेकडून त्यांची दुसऱ्या दिवशी चाचणी करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे ही चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे खाजगी लॅबच्या अहवालांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याला फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट असे म्हणतात. या संपूर्ण प्रकारामुळे आम्हाला खूप त्रास झाला, आमचे पैसे देखील फुकट गेले, त्यामुळे निदान आमचे पैसे तरी परत मिळावे, कारण आमची परिस्थिती वाईट आहे, अशी मागणी समीरने सरकारकडे केली आहे.
ठाणे महापालिकेचा दोन खासगी रुग्णालयांना दणका, जवळपास 16 लाख रुपये दंडाची कारवाई
ही घटना झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने या खाजगी लॅब वर कारवाई करण्याचे ठरवले. एक नोटीस पाठवून महानगरपालिका क्षेत्रात यापुढे चाचण्या न करण्याचे आदेश दिले आहेत. तुर्भेमध्ये असलेल्या या लॅबवर अतिरिक्त आयुक्तांनी कारवाई केली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त, संदीप माळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली.
या दुर्दैवी प्रकारानंतर समीर खानच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. यासोबत अनाठाई त्यांचे पैसे देखील वाया गेले. त्यामुळे सरकारने या प्रकाराकडे लक्ष देऊन अशा घटना होऊ नये यासाठी खाजगी लॅब्स वर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे असे दिसून येत आहे.
कोविड पॉझिटिव्ह सांगितलेले रिपोर्ट निघाले निगेटिव्ह, ठाण्यात खाजगी लॅबवर कारवाई
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
08 Jun 2020 07:37 AM (IST)
एका घरातील एकूण बारा जणांची चाचणी या खाजगी लॅब मधून केली होती. त्यासाठी 36 हजार रुपये घेतले.
या चाचणीचा रिपोर्ट आला, त्यात सहा जण पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आले. मात्र नंतर सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्यावर ते रिपोर्ट निगेटिव्ह आले.
संग्रहित छायाचित्र
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -