संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे मिल्लत नगर वंजारपट्टी नाका या ठिकाणी महिला 48 दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यास शहरातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी दररोज हजारो महिला सायंकाळी एकत्रित होत असतात, परंतु सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता त्याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असल्याने येथील आंदोलन 31 मार्चपर्यंत अंशतः स्थगित करण्यात आलं आहे. तसेच आंदोलनकारी महिलांनी स्वतः ची काळजी घेत आरोग्य विषयक जनजागृती या शाहीनबाग आंदोलना दरम्यान करतील
या आंदोलनात येणाऱ्या मुस्लिम महिला या बुरखाधारी आणि पाच वेळच्या नमाजसाठी वजू करून येत असल्याने सहाजिकच महिला वैयक्तिक स्वच्छता बाळगत आहेत. तसेच समिती आयोजकांनाकडून महिलांची विशेष काळजी घेण्यात येत असून वैद्यकीय दक्षता घेतली जात आहे. तरी करोना व्हायरसच्या भीतीने आम्ही कोणताही धोका न पत्करता हे आंदोलन करीत राहणार असल्याचं आंदोलनकाऱ्यांनी सांगितलं.
Bank closed | पुढच्या आठवड्यात बँका सलग चार दिवस बंद राहणार | ABP Majha
राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
- पुणे - 8
- पिंपरी-चिंचवड - 10
- मुंबई - 7
- नागपूर - 4
- यवतमाळ - 3
- कल्याण - 3
- नवी मुंबई - 3
- रायगड - 1
- ठाणे - 1
- अहमदनगर - 1
- औरंगाबाद - 1