ठाणे : एकीकडे ठाण्यात कोरोनोची लागण वाढीस लागलेली असतानाच आणि ठाण्यात रोगप्रतिबंधक फवारणी आवश्यक असतानाच ठाणे पालिकेसमोर नवे संकट उभे राहिले आहे. फायलेरिया विभागाच्या कंत्राटी कामगारांना तीन महिने पगारच दिला गेला नाही. याबाबत ठाणे पालिका कुठलीच दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणूनच गुरुवारी कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फवारणी मिनी टँकर पालिका मुख्यालयासमोर उभे केल्याने ठाण्यात रोगप्रतिबंधक फवारणीवर आता प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.


ठाणे पालिकेच्या हद्दीत रोगप्रतिबंधक फवारणी करण्याचे कंत्राट फायलेरिया विभागाने शीला पाटणकर या ठेकेदाराला दिले आहे. या ठेकेदारांमार्फत कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत कंत्राटी कर्मचारी फवारणी करीत आहेत. मात्र त्यांना तीन महिन्यापासून पगारच मिळाला नसल्याने त्यांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. पालिका प्रशासन महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष करीत असलायचा आरोप कर्मचारी यांनी केला आहे. तर महिन्याला वेतन द्या, सुरक्षेसाठी युनिफॉर्म, हन्ग्लोज, मास्क द्या अशी मागणी या कंत्राटी कर्मचारी यांनी केली आहे.


पाहा व्हिडीओ : हातावर पोट असलेल्या 8हजार जणांना मदत, भाजप नेते प्रवीण दरेकरांची उपनगरात मोहीम



ठाणे पालिकेच्या फायलेरिया विभागाने मागच्या आठ महिन्यापासून थकीत दीड कोटीचे बिल दिले नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या फवारणीच्या मिनी टँकरमध्ये इंधन टाकण्यातही पैसे राहिले नाहीत. आता फवारणीचे काम थंडावले असून ज्या सोसायटीने फवारणीची गरज असेल त्यांना फवारणीच्या टँकरमध्ये इंधन टाकून फवारणीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. पालिका प्रशासन बिले देत नाही, कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेत नाही. त्यांना वेळेवर वेतनही देत नाही. त्यामुळे कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेल आहे, असे शिला पाटणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | ठाण्यात सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन, मार्केटचे निर्जंतुकीकरण


Corona Lockdown | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडणार


'गो कोरोना, कोरोना गो' नंतर रामदास आठवले यांची नवी घोषणा