मुंबई : कोरोना गो, गो कोरोना ही घोषणा देशाला देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता नवीन घोषणा दिली आहे. गो कोरोना, कोरोना गो नाही तर नो कोरोना, नो कोरोना अशी नवी घोषणा रामदास आठवले यांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. यावेळी देशभरात प्रसिद्ध झालेली घोषणा त्यांच्या डोक्यात कशी आली? लॉकडाऊनच्या काळात घरी ते काय करतात? यासंह अनेक प्रश्नांना आठवले यांनी दिलखुलास उत्तरे दिली.


कोरोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो अशी घोषणा देणार रामदास आठवले यांनी आज एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. मला हवा होता तसा कोरोना जाताना दिसत नाही. मात्र, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात तेवढं प्रमाण नाहीय, अशी प्रतिक्रिया रामदार आठवले यांनी दिली. गेट वे ऑफ इंडिया येथे चीन देशाच्या काही प्रतिनिधींसोबत प्रतिकात्मक 'कोरोना गो'ची घोषणा दिल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आपण घरात राहणे आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रथमचं मी स्वतःला घरात कोंडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. मी कविता करतो, मित्रांना फोन करतो, गिटार वाजवतो, स्नूकर खेळण्याचा प्रयत्न करत वेळ घालवत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

घरबसल्या कोरोनाची लक्षणं ओळखा; विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल

म्हणून मला घोषणा आठवली
चीनमध्ये कोरोना आला होता, त्यामुळे कोरोना गो ही घोषणा मला आठवली. माझं नाव आठवले असल्याने मला योग्य गोष्टी योग्य वेळी आठवतात, असं मिश्किल उत्तरही त्यांनी दिलं. या घोषणेमुळे माझं नाव आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचंलं असल्याचं ते म्हणाले. आता मी म्हणतो गो कोरोना, गो कोरोना...नो कोरोना नो कोरोना. दरम्यान, माझ्या घोषणेने कोरोना जाणार नाही. मात्र, ही घोषणा प्रतिकात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना उपचारासाठी 30 विशेष रुग्णालये घोषीत; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कुटुंबासोबत वेळ चांगला जातो
कोरोनामुळे घरी राहावे लागत असल्याने मला आता खूप वेळ मिळत आहे. हा वेळ मी माझी पत्नी, मुलगा, बहीण यांच्यासोबत घालवत आहे. पूर्वी कामाचा व्याप जास्त असल्याने मला वेळेवर नाश्ता, जेवण करता येत नव्हते. मात्र, आता वेळेवर जेवण होतं. स्वयंपाक घरात तुम्ही का दिसले नाही? या प्रश्नावर आठवले म्हणाले, की मला स्वयंपाकातलं जास्त कळत नाही. मात्र, मी आता नक्की प्रयत्न करेल. त्यामुळे भविष्यात आठवले यांचे स्वयंपाक घरातील फोटो पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

#Corona Current Update | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 416वर, एकाच दिवसात 81नवे रुग्ण