मुंबईतील डोंगरी भागाचे सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी आपल्या भागात फिरुन माईकवरुन लोकांना घरी राहण्याबाबत सूचना देत होते. डोंगरीतील टेमकर स्ट्रीट भागात कर्फ्यू असताना देखील मोठ्या प्रमाणात लोक मशीदीत नमजासाठी जमले होते. यावर अविनाश धर्माधिकारी यांनी कडक कारवाई करत जमलेल्या लोकांना बाहेर काढत मशीदीला ताळं ठोकलं. तसेच याविरोधात गुन्हा देखील नोंदवला. काही भागात लोकांनी पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली.
यावर सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी ‘बहुतेक लोकांना वाटतं आहे की त्यांना काही होणार नाही. आम्ही त्यांना कोरोनाच्या गंभीरतेबाबत समजवत आहोत. जे लोकं आमचे म्हणणं ऐकतं नाही अशांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल,’ असा इशारा दिला.
दरम्यान दुसऱ्या भागात पोलिस अनावश्यक कांमासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवी करताना दिसून आले. काही भागात लोकांना पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला. अशा प्रकारची कारवाई मुंबईतच नाही तर राज्यात होताना आपल्याला पाहयला मिळाली.
VIDEO | संचारबंदी असतानाही डोंगरीतील लोक घराबाहेर
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 वर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मुंबईतील 12 जणांची दुसरी चाचणी निगेटिव्ह
दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय दाखल केलेल्या 12 रुग्णांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
coronavirus | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण
भिवंडीत होम कोरेन्टाईन संशयितांची नागरीकांना भीती, कारवाई करण्यात प्रशासन अपयशी
बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी, दिवसाआड औषध फवारणी; कोल्हापुरातील माणगावाचा स्तुत्य उपक्रम