सांगली : देशभरात थैमान घातलेल्या 'कोरोना' चे चार रूग्ण सांगलीत आढळले आहेत. 'कोरोना' बाधित चौघे रूग्ण इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून आले आहेत. चौघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.


सांगलीच्या वाळवा तालुक्यातून चार प्रवासी सौदी अरेबिया येथे उमराह देवदर्शनासाठी गेले होते. हे चौघे नुकत्याच प्रवास करून परतले होते.   त्यांचे रिपोर्ट आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, या चारही प्रवाशांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. तसेच या चारही कोरोना बाधित रुग्णांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले आहे.


coronavirus update | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण



संबंधित चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.  हे चारही जण सौदी अरेबियामध्ये उमराह येथे देवदर्शनासाठी गेले होते. 13 मार्चला सांगली जिल्ह्यात आले. 19 मार्चला रूग्णालयात दाखल करण्यात आले. 21 मार्चला नमुने तपासणी साठी पाठवले होते. सोमावारी (23 मार्च) रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या चौघांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मिरजेतील सिव्हील रूग्णालयात त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर मिरज सिव्हील परिसर सामसूम झाला होता.


तपासणीच्या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत परदेशवारी करून 490 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 422 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 40 व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वॉरेन्टाईन कालावधी पूर्ण झाला आहे.


संबंधित बातम्या :


सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा


Coronavirus | कोरोनाची लक्षणं जाणवणाऱ्या संशयितांची घरीच चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय


Coronavirus : टोकियो ऑलिम्पिक लांबणीवर पडण्याची शक्यता