मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात 5 हजार 71 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई मंडळात सर्वाधिक 4242 एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


राज्यात 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.


शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी; प्रभावित क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण


आज सोडण्यात आलेल्या 5071 रुग्णांमध्ये मुंबई मंडळात 4242 (आतापर्यंत एकूण 39 हजार 976) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 568 (आतापर्यंत एकूण 8430), नाशिक मंडळात 100 (आतापर्यंत एकूण 2365), औरंगाबाद मंडळ 75 (आतापर्यंत एकूण 1945), कोल्हापूर मंडळ 24 (आतापर्यंत एकूण 1030), लातूर मंडळ 11 (आतापर्यंत एकूण 444), अकोला मंडळ 22 (आतापर्यंत एकूण 1048), नागपूर मंडळ 29 (आतापर्यंत एकूण 811) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही
देशात कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असले तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग (community transmission) झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे बोलले जात होते. यावर देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव (Balram Bhargav) यांनी म्हटले आहे.


Unlock 1.0 | शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता