मुंबई : राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही असा जिल्हा ऑरेंज झोन तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असं राजेश टोपे म्हणाले. तर ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असेल, असंही टोपे यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार 15 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
''
पूर्वीचा निकष नवा निकष
15 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन 14 दिवसात नवा रुग्ण आढळला नाही तर ऑरेंज झोन
रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन 28 दिवसात नवा रुग्ण आढळला नाही तर ग्रीन झोन
Maharashtra Lockdown | अर्थचक्राला चालना; ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योगांना सूट