नवी मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने रुग्णालयात दाखल न करणाऱ्या पत्नीची हत्या केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह पतीला पत्नीने रूग्णालयात घेऊन न जाता घरातील गॅलरीमध्ये चार- पाच दिवस विलगीकरणात ठेवलं होतं. हाच राग मनात ठेवत पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याचा कोयता घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पनवेल जवळील करंजाडे गावातील घटना असून कोरोना पॉझीटिव्ह असलेल्या पतीला अटक करून कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संतोष पाटील आसं 40 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर 4, प्लॉट नं 20, साई सत्यम सोसायटीमधील तिसर्या मजल्यावर बी-305 येथे हे दाम्पत्य राहत होतं. पत्नी संध्या पाटील (वय 35) हिने आजारी असताना देखील औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन न जाता पतीला गॅलेरीत 4-5 दिवस विलगीकरण करून ठेवलं. याच गोष्टीचा राग संतोषला होता.
हाच राग मनात धरत संध्याशी संतोषने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद टोकाला गेला आणि संतोषने मासे कापण्यासाठी लागणारा कोयता आपल्या पत्नीच्या डोक्यात घालून तीची हत्या केली. सदरच्या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी घटणास्थळी पोहचत आरोपी पती संतोष पाटील याला अटक केली आहे. संध्या पाटील यांच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी संतोषला अटक करून कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली. यानंतर त्याला कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इतर बातम्या