मुंबई : मुंबई शहर  कोरोना हॉटस्पॉट हे कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही होते आता दुसऱ्या लाटेत सुद्धा आह.  दुसऱ्या लाटेत तर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढली होती. पण आता मात्र कोरोना रुग्ण वाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे. मुंबईकरसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 


देशात कोरोनाची दुसरी लाट ही मार्च महिन्याच्या शेवटी सुरू झाली. महाराष्ट्र राज्यातील मोठी शहर मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान घातलाय. यात मुंबईची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढली एके दिवशी तर दिवसाला11 हजारवर रुग्ण संख्या येत होती. पालिकेने एका रुग्णामागे जास्त लोक पॉझिटिव्ह होऊ लागले. पण आता मुंबईतील कोरोनाचा आकडा स्थिरावला आहे. 


मुंबईची सध्याची स्थिती 



  • गेल्या पंधवड्यात कोरोनारुग्णवाढीचा वेग निम्म्यावर

  • गेल्या 15 दिवसांत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत 50% ची घट

  • गेल्या 20 दिवसांत मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 22% वरुन 15% ते 17% वर स्थिरावलाय 

  • कोविड चाचण्यांची संख्या वाढवूनही रुग्णसंख्येत घट

  • गेल्या 24 तासात नवीन कोरोनारुग्णांची संख्या 6000 च्या खाली...गेल्या 24 तासांत 5197 नव्या कोरोना रुग्णाची नोंद

  • 4 एप्रिल ला एका दिवसांत 11, 163 एवढे सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडले होते

  • रुग्णसंख्येत दिलासा मात्र, मृत्युसंख्येत वाढ

  • मात्र, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असली तरी दैनंदिन मृत्युसंख्या मात्र वाढत आहे

  • एप्रिलच्या सुरुवातीला दर दिवसाला मृत्युसंख्या 25 च्या आत होती. ती आता गेल्या दोन दिवसांपासून 70 ते 75 च्या दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील कोरोना सद्यस्थिती काय सांगते? 


शुक्रवारी 66  हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.  दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के  झाले आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.