ठाणे : ठाणे महानगर पालिकेची आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय वसंत विहार येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याला आला. 13 एप्रिलपासून रुग्णालयात दाखल करण्यासाठी विनंती करुनही वॉर रुममधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या दाम्पत्याने घरातच स्वत:हून ऑक्सिजन लावून घेतले. तीन दिवस उलटले तरी बेड मिळत नसल्याने शेवटी त्यांनी आरोयमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर आज त्यांना बेड उपलब्ध झाला.  


वसंत विहार येथील व्होल्टास कॉलनी येथे राहणार्‍या दाम्पत्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. ठाणे न्यायालयात कार्यरत असलेली एक महिला आणि पोलीस असलेला तिचा पती यांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट 13 एप्रिल रोजी आला होता. त्यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. त्यानंतर पालिकेच्या कर्मचार्‍यांनीही या दाम्पत्याची विचारपूस केली. मात्र, दोन दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांची कुठेही व्यवस्था झाली नाही. त्यानंतर या दाम्पत्याने वॉररुमशी संपर्क साधल्यानंतर, "तुमची नोंदणीच झालेली नाही; त्यामुळे तुम्हाला बेड कसा मिळणार?” असा प्रतिप्रश्न करुन रुग्णालयातील प्रवेश 


 गुरुवारी सदर महिलेची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या तिच्या पतीनेच बाहेर जाऊन ऑक्सिजनची व्यवस्था केली. अन् घरातच या महिलेला ऑक्सिजन लावला. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून या दाम्पत्याला रुग्णालय उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, नोंदणीचे कारण पुढे करुन रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मेसेजद्वारे या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर टोपे यांचे स्वीय सहाय्यक वैभव काळे यांनी फोनद्वारे संबधितांना सूचना दिल्यानंतर एका बेडची व्यवस्था करण्यात आली. आज संध्याकाळी त्यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 


राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाहीय. आज राज्यात सर्वाधिक  63,729 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज 8803 रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाणे मंडळात 17,635 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.