स्कूल चले हम... दुर्घटना घडल्यावरच उभारेल का पूल? जीवघेणा प्रवास, विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सरकारने शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कोट्यवधि रुपये खर्चे केले आहेत. विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून शिक्षणाची जनजागृती केली.
Continues below advertisement
Palghar School student river journey
Continues below advertisement
1/8
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सरकारने शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कोट्यवधि रुपये खर्चे केले आहेत. विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून शिक्षणाची जनजागृती केली. त्यामध्ये, स्कूल चले हम हे गाणंही खूप गाजलं.
2/8
बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम स्कूल चले हम... या काव्यपंक्तीमधून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या आहेत. तर, काहीही झालं तरी आम्ही शाळेत जाणारच हेही सांगणाऱ्या आहेत.
3/8
देशाची सध्या डिजिटल इंडिया कडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहचावं लागतंय.
4/8
पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा असाच धोकादायक, जीवघेणा प्रवास व्हिडिओतून समोर आलाय. येथील एका नदीवर पूल नसल्याने विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यात धोकादायक प्रवास करत आहेत.
5/8
शाळेचा गणवेश परिधान करुन नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबराच्या ट्यूबवर बसून विद्यार्थी नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Continues below advertisement
6/8
म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात. उन्हाळ्यात या नदीत पाण्याचा प्रवाह कमी असल्याने हे विद्यार्थी सहज नदी ओलांडत शाळेत पोहोचतात.
7/8
पावसाळ्यात नदीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायरमधील ट्यूबचा आधार घेत जीवघेणा प्रवास करत आहेत. आपल्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये म्हणून दररोज या चिमुकल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना देखील तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे.
8/8
मागील अनेक वर्षांपासून पिंजाळ नदीवर या ठिकाणी पुलाची मागणी असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
Published at : 02 Jul 2025 09:01 PM (IST)