मुंबई : मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याची स्वप्नं तिच्या आईवडलांनी रंगवली होती. मात्र, या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाच्या चिंतेनं ग्रासलंय. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल मधल्या स्टाफनं लेकीच्या वाढदिवसाचं स्वप्नं अनोख्या रितीनं पूर्ण केलं. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये उपचार सुरु असलेल्या एक वर्षीय कोरोनाग्रस्त मुलीचा वाढदिवस येथील डॉक्टरांच्या मदतीने वैद्यकीय काळजी घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी केक कापताना तिच्या आईवडिलांनी व डॉक्टरांनी पीपीई किट्स परिधान केले होते.


तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे एक कोरोनाग्रस्त दाम्पत्य दाखल झाले असून त्यांच्या एका वर्षाच्या मुलीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून तिच्या वडिलांनाही कोरोना संसर्ग झाला होता. या मुलीची आई कोरोनाची संशयित रुग्ण असून तिला सुद्धा विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.


MH@47,190 | राज्यात दोन हजारपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचा सलग सातवा दिवस!


आज या मुलीचा पहिला वाढदिवस होता व आज तिचे आई वडील तिच्याजवळ असूनही हा वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. दोन महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्याचे ठरविले होते. परंतु, कोरोना संकटात हे कुटुंब अडकल्यामुळे त्यांची ही इच्छा अपुरी राहणार काय अशी चिंता त्याना सतावत होती. म्हणूनच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांनी या कुटुंबाची ही इच्छा पूर्ण केली.


तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केक आणून या मुलीचा वाढदिवस साजरा केला. कोरोनाच्या संकटात आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केल्यामुळे या दाम्पत्याने तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमधील डॉक्टरांचे आभार मानले.


राज्यात आज 2 हजार 608 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ


राज्यात आज 2 हजार 608 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळण्याचा आजचा सलग सातवा दिवस आहे. 17 मे पासून दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूची संख्या 1577 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 821 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 13 हजार 404 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत एकूण 47 हजार 190 लोकांना राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. पैकी 32 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


Hydroxicloroquin | हायड्रॉक्सिक्लोरोक्विनमुळे मृत्यूचा धोका वाढतो, जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल लॅन्सेटचा दावा