मुंबई : ठाकरे सरकारने आगामी बकरी ईदचा सण प्रतिकात्मक साजरा करावा, असं मुस्लीम समाजाला आवाहन केलं आहे. तसे फर्मान देखील नुकतंच काढलं आहे. याला आता विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयाचा कॉंग्रेसचे वरीष्ठ नेता नसीम खान यांनी कडाडून विरोध केला आहे. ठाकरे सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे, असं म्हणत त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आघाडीत एका नव्या विषयावरुन वादाला तोंड फुटलं आहे. एकंदरीत आता माजी खासदार संजय निरुपम आता नसीम खान यांनी आपल्याच पक्षाच्या भूमिकेविरोधात पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.


याबाबत बोलताना नसीम खान म्हणाले की, सरकारच्या या निर्णयाविरोधात मी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सरकारने मुस्लीम समाजाने बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करावी. तसेच बकरा देखील ऑनलाईन खरेदी करावा, असं आवाहन मुस्लीम समाजाला केलं आहे, हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम नेता, धर्मगुरू आणि मुस्लीम समाज नाराज झाला आहे. सरकारने लवकरात लवकर हा निर्णय बदलून बकरी ईद सुरक्षितरित्या साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने बकरा ऑनलाईन खरेदी करावा असं म्हटलं आहे. परंतु अडचण अशी आहे की, आम्ही ऑनलाईन बकरे शोधणार कुठे? याची तर काहीच सरकारने सोय केलेली नाही. दुसरी महत्त्वाची बाब एखादे बकरे खरेदी करायचे असेल तर त्यासाठी प्रथम त्याचे वजन, तब्येत पाहावं लागतं. इंटरनेटवर फोटो पाहून तर हे नक्कीच शक्य नाही. अशा पद्धतीने कुर्बानीसाठी बकरे खरेदीचं करता येतं नाही.


वारी, गणेशोत्सवाप्रमाणे ईदही साधेपणाने साजरी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन


नसीम खान पुढे म्हणाले की, इस्लाम धर्म प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यासाठी परवानगी देतं नाही. सरकारने ज्या पद्दतीने गणेशोत्सवाला सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे पालन करून साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्याच पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी. याबाबत सरकारला घेरताना नसीम खान म्हणाले की, शासनाने लवकरात लवकर निर्णय बदलावा आणि मुस्लीम समाजातील नेता, धर्मगुरू यांच्यासोबत लवकरात लवकर एक बैठक घेऊन चर्चा करावी आणि योग्य निर्णय घ्यावा. नसीम खान यांचं म्हणणं आहे की, सत्तेत असणाऱ्या काही जणांनी बकरी ईद सणाबाबत योग्य माहिती आणि मुस्लिम समाजाच्या भावना योग्यरित्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्या नाहीत. त्यामुळेच अशा पद्धतीचा तुघलकी निर्णय लागू करण्यात आला आहे.



एकदंरीत नसीम खान यांनी आशा प्रकारे वक्तव्य करून आपल्याच पक्षातील नेत्यांना दोषी ठरवलं आहे. नसीम खान यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकारणाला सुरुवात झाली आहे. आता भाजपपासून एमआयएमपर्यंत सगळेचं एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.


गणेशोत्सवाच्या धर्तीवर बकरी ईदलाही परवानगी द्या, नसीम खान यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


इम्जियाज जलील, एमआयएम खासदार म्हणाले की, कुठल्याही सणाला एक महत्व असतं. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी करण्याची परंपरा आहे. ती आम्ही पार पाडणार आहोत. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सरकारनं यावर तोडगा काढायचा असेल तर आमच्यासोबत चर्चा करावी.


विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला साथ देत म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वांनी सरकारला सहकार्य करावं, प्रतिकात्मक बकऱ्याची कुर्बानी करावी. तर एनसीपी प्रमुख शरद पवार म्हणाले, कोरोना वाढणार नाही. याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. रमजान ईदप्रमाणे याही वेळी मुस्लीम बांधव सांमजस्याची भूमिका घेतली अशी अपेक्षा आहे.


Majha Vishesh | बकऱ्यांची कुर्बानी, नियम की मनमानी? सणांना दिसलेलं सामंज्यस्य आता का नाही? ABP Majha