मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते. आता पुन्हा एकदा मातोश्रीचं टेन्शन वाढलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तेजस ठाकरे
यांच्या इतर सुरक्षा रक्षकांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली आहे.


तेजस ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव असून त्यांना व्हाय प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांची तातडीनं चाचणी करण्यात आली आहे. तसेच इतर सुरक्षा रक्षकांना तातडीनं क्वॉरंटाईनही करण्यात आलं आहे.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याआधी मातोश्रीबाहेरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तेथे मातोश्रीवर सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच मातोश्रीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते.


मातोश्रीनंतर कोरोनाने थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर धडक दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली होती. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या : 


Matoshree | 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह


Coronavirus | मातोश्रीनंतर 'वर्षा'च्या अंगणात कोरोना; मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर तैनात पोलिस अधिकाऱ्याला कोरोना